आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारमध्ये शनिवारी सर्व ३८ जिल्ह्यांमध्ये जातीय गणना सुरू झाली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी वैशाली जिल्ह्यातील हरसेर गावात मनोज पासवान यांच्या घरातून याचा शुभारंभ केला. पहिल्या दिवशी २ लाख कर्मचाऱ्यांनी १४ लाखांपेक्षा जास्त घरांची गणती केली. अन्य जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांनी घरांची मोजणी केली. मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, आम्ही जनगणना कर्मचाऱ्यांना सांगितले की, योग्य पद्धतीने सर्व नोंदणी करा. एखाद्या व्यक्तीचे घर येथे आहे आणि तो परराज्यात असेल तर त्याची माहिती घ्या. आम्ही जात गणनेसह त्याच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करू.यामुळे समाजात किती दारिद्र्य आहे आणि त्यांना कसे वर आणता येईल ते कळेल. अहवाल आल्यावर तो प्रकाशीत केला जाईल. केंद्र सरकारलाही हा अहवाल पाठवू.लोकांच्या आर्थिक विकासासाठी गणना आवश्यक आहे.
टप्पा-1: ७ ते २१ जानेवारी, घरांची गणना होणार
कर्मचाऱ्यांचे आयकार्ड असेल. यावर बिहार जात आधारित गणना-२०२२ लिहिले असेल. आयकार्ड पाहून पूर्ण माहिती देऊ. १५ दिवसांत घरांची गणती होईल. लाल मार्करने घराबाहेर क्रमांक लिहिला जाईल. हा स्थायी पत्ता असेल. फॉर्मेटमध्ये कुटुंबप्रमुखाचे नाव असेल.
काही आक्षेपही घेतले जातात
अर्थतज्ज्ञ एन.के. चौधरी म्हणाले, मंडल आयोगानंतर पुन्हा एकदा राज्यात जातीय भावना पसरू शकते. यामुळे राजकीय ध्रुवीकरण होईल, मात्र समाजात दुफळी माजेल.
हे फायदे सांगितले जाताहेत
वार्डनिहाय जाती, कुशल व्यक्ती एका जागी उपलब्ध हाेतील.
आर्थिक-सामाजिक वंचित व मागासांच व्यवस्थापन शक्य
सामाजिक उच्च-नीचता, आर्थिक दरी कमी करण्यात मदत.
काही आक्षेपही घेतले जातात
अर्थतज्ज्ञ एन.के. चौधरी म्हणाले, मंडल आयोगानंतर पुन्हा एकदा राज्यात जातीय भावना पसरू शकते. यामुळे राजकीय ध्रुवीकरण होईल, मात्र समाजात दुफळी माजेल.
कर्नाटक: अशी चूक होऊ नये
कर्नाटकने २०१४ मध्ये जातीय गणना सुरू. मात्र, रिपोर्ट नाही.
गणनेत १९२ जाती वाढल्या. ८० अशा होत्या,जिच्यात १० लोक होते. लोकसंख्या ६.३ कोटी, मात्र ३२ लाख सुटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.