आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM भगवंत मान यांचा मोठा आरोप:​​​​​​​पठाणकोट अतिरेकी हल्ल्यानंतर केंद्राने सैन्य पाठवण्यासाठी मागितले होते 7.50 कोटी, टीकेनंतर बदलला निर्णय

चंदिगड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पठाणकोटवरील अतिरेकी हल्ल्यानंतर केंद्राने सैन्य पाठवण्यासाठी तब्बल साडेसात कोटी रुपये मागितल्याचा खळबळजनक आरोप पंजाबचे मुख्यंमत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी केला. मान म्हणाले -मी त्यावेळी खासदार होतो. केंद्राच्या मागणीची माहिती समजल्यानंतर मी खासदार साधू सिंह यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

मी म्हणाले -मी राजनाथांना ही रकम माझ्या खासदार निधीतून कापून घेण्याची विनंती केली. तसेच केंद्राने पंजाबला लष्कर किरायाने दिले होते असे लेखी देण्याचीही विनंती केली. पंजाब देशाचा भाग नाही काय? सर्वप्रथम बंदुकीची गोळी आमच्या छातीवर झाडली जाते. त्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी एक रुपयाही घेतला नाही.​​​​​​​

2016 मध्ये झाला होता अतिरेकी हल्ला

लष्कराच्या गणवेशात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी 2 जानेवारी 2016 रोजी पठाणकोट हवाई तळावर हल्ला केला होता. त्यात 7 जवान शहीद झाले होते. तपासात अतिरेक्यांनी रावी नदी ओलांडून भारतात घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांनी एका गाडीचे अपहरण करुन पठाणकोट तळ गाठला होता. त्यानंतर आलेल्या सैनिकांनी 5 अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते.

पठाणकोट हल्ल्यावेळी कारवाईसाठी सज्ज सैनिक
पठाणकोट हल्ल्यावेळी कारवाईसाठी सज्ज सैनिक
बातम्या आणखी आहेत...