आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ल्याच्या दोन दिवसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याच्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर बोलावले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नड्डा यांच्या सुरक्षेला जबाबदार प. बंगालच्या ३ आयपीएसना केंद्रात प्रतिनियुक्ती सेवेत बोलावण्यात आले आहे. सर्व आयपीएस अधिकाऱ्यांना नियंत्रित करणाऱ्या नियमांतर्गत हा निर्णय झाला. सहसा भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर घेण्याआधी राज्य सरकारची परवानगी घेतली जाते.
याआधी शुक्रवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्याबाबत राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपींना हजर होण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने अधिकाऱ्यांना न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, अहवाल मागवण्यासाठी केंद्राने ज्या पद्धतीने पत्र पाठवले आहे ते घटनाबाह्य आहे. संघीय संरचनेत हस्तक्षेप करता यावा यासाठी भाजप व केंद्राकडून अशी स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.