आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गृह मंत्रालयाने देशभरातील विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे १ जुलैपासून लागू केलेल्या अनलॉक -२ मध्ये शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ व अन्य शैक्षणिक संस्था उघडण्यास परवानगी दिली नव्हती.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पाठवलेल्या पत्रात विद्यापीठ व इतर संस्थांना परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना व विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्रानुसार अंतिम परीक्षा घेणे अनिवार्य आहे. परीक्षेदरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदर्श कार्यपद्धतीचे पालन करावे लागेल.
सप्टेंबरमध्ये परीक्षा देता आली नाही तर आणखी एक संधी :
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने म्हटले आहे की, विद्यापीठांना सत्र किंवा अंतिम वर्षाची परीक्षा सप्टेंबरअखेर घ्यावी लागेल. आधी जुलैपर्यंत परीक्षा घेण्याचे निश्चित होते. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन किंवा दोन्ही पद्धतीने एकत्रितपणे घेता येतील. सप्टेंबरमध्ये एखादा विद्यार्थी अंतिम परीक्षा देण्यास सक्षम नसेल तर त्याला आणखी एक संधी दिली जाणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.