आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Central Government Is Also Serious About The Power Crisis; Amit Shah Called An Emergency Meeting

नवी दिल्ली:वीज संकटावर केंद्र सरकारही गंभीर; अमित शहांनी घेतली तातडीची बैठक

नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभर कोळशाच्या तुटवड्यामुळे ओढवलेल्या वीज संकटाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सातत्याने संबंधित विभागांच्या बैठका घेत आहेत. सोमवारी केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह आणि कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांनी शहा यांची भेट घेतली. या बैठकीच्या वेळी ऊर्जा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, देशभर वीजगळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही वीजप्रश्नी आक्रमक झाले आहेत.

- केरळ : विजेअभावी १९ ऑक्टोबरनंतर भारनियमनाबाबत निर्णय घेणार : ऊर्जामंत्री कृष्णनकुट्टी - बिहार : पूर्वीसारखा कोळशाचा पुरवठा होणे बंद असल्याने अडचण : मुख्यमंत्री नितीशकुमार - छत्तीसगड : केंद्र सरकारचे दावे खोटे. वीजनिर्मिती केंद्र बंद पडत आहेत. : मुख्यमंत्री भूपेश बघेल

२० रुपये महागड्या दराने खरेदी करून महाराष्ट्रात सुरू आहे विजेचा पुरवठा
पावसामुळे कोळशाचा पुरवठा घटल्याने राज्यातील वीजनिर्मितीत घट झाली असली तरी दोन महिन्यांपासून केंद्र सरकारकडून कोळशाचा आवश्यक पुरवठा राज्याला करण्यात येत नसल्याची माहिती ऊर्जा खात्यातील सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्र शासन २० रुपये महागड्या दराने वीज खरेदी करून वितरित करत आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत या प्रश्नावर मंगळवारी उच्चस्तरीय आढावा बैठक घेत आहेत.

महाराष्ट्र शासनाने ५ ऑगस्ट रोजी केंद्राकडे कोळशाची मागणी नोंदवली आहे. मात्र, दोन महिने उलटले तरी त्यास प्रतिसाद नाही. सर्वाधिक खाणी असलेल्या महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा राज्य सरकारचा आरोप आहे.

कोळशाचा साठा अन् वीजनिर्मितीची स्थिती अशी-
- परळी विद्युत केंद्र : ९,६७५ मेट्रिक टन (एक दिवसही वीजनिर्मिती अशक्य)
- पारस विद्युत केंद्र : ६,९४८ मेट्रिक टन (एक दिवसही वीजनिर्मिती अशक्य )
- नाशिक विद्युत केंद्र : ८,२३६ मेट्रिक टन ( दीड दिवस वीजनिर्मिती शक्य)
- कोपरखेडा विद्युत केंद्र : ३१,२५८ मेट्रिक टन (दीड दिवस वीजनिर्मिती शक्य)
- भुसावळ विद्युत केंद्र : २८,७३० मेट्रिक टन (दीड दिवस वीजनिर्मिती शक्य)
- चंद्रपूर विद्युत केंद्र : ८६,२६४ मेट्रिक टन (पावणे दोन दिवस वीजनिर्मिती शक्य)

बातम्या आणखी आहेत...