आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोना लसीच्या वितरणाची तयारी जोरात सुरू आहे. लस तयार करत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक कंपन्यांना केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेने (सीडीएससीओ) आणखी डेटा मागितला आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात लस वितरणासाठी निवडणूक आयाेगाच्या बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांची (बीएलओ) नियुक्ती करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहे.
पीएमआे, गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बीएलओंवर चर्चा झाली. बीएलओंना त्यांच्या भागातील सर्व मतदार, त्यांचे पत्ते आणि वयाची पूर्ण माहिती असते. नीती आयोग निवडणूक आयोगाकडे एक प्रस्ताव पाठवण्याची तयारी करत आहे.
भारतात 8 लसी तयार होणार : हर्षवर्धन
देशात लसीच्या गुणवत्तेबाबत कसलीही तडजोड केली जात नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिले आहे. ते म्हणाले, जगभरात सध्या २०८ लसींच्या विविध टप्प्यांतील चाचण्या सुरू आहेत. यापैकी ८ लसी भारतात तयार होत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.