आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Central Government Will Do The First Labor Census, A Lesson Learned By The Central Government From The Corona Period

केंद्र करणार पहिली श्रमगणना:डॉक्टर, वकील, मजूर, माळी सर्वांची होणार गणती; कोरोना काळातून केंद्र सरकारने घेतला धडा

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तेव्हा... लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुरांचा आकडा सरकार संसदेत सांगू शकले नाही
  • आता... जिल्हास्तरावर मजूरच नव्हे, तर प्रत्येक व्यावसायिकाची नोंद, नमुना सर्वेक्षणानुसार गणती

कोरोना काळात देशव्यापी टाळेबंदीदरम्यान प्रत्येक मोठ्या शहरातून लाखो मजूर स्थलांतरित होत असल्याची छायाचित्रे संपूर्ण देशाने पाहिली. मात्र, यांची संख्या किती होती, कोणत्या राज्यातून किती मजूर कुठे गेले आणि त्यापैकी किती जण कामावर परतले. हा आकडा कोणाकडेच नाही. एवढेच नव्हे तर केंद्र सरकार संसदेत या प्रश्नावर उत्तर देऊ शकले नाही. मात्र, कोरोना काळातील या धड्यातून सरकार भविष्यासाठी बोध घेत आहे. आता प्रथमच केंद्रीय कामगार मंत्रालयाने देशव्यापी कामगार गणनेची तयारी केली आहे. याअंतर्गत मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारा कामगार ब्युरो पूर्ण देशात प्रत्येक व्यवसायाशी संबंधित व्यक्तीची गणना करेल. म्हणजे, संपूर्ण देशात किती वकील, डॉक्टर-अभियंते, सीएच नव्हे तर किती मजूर, माळी, स्वयंपाकी आणि चालकापर्यंत सर्वांची गणना होईल. कामगार व रोजगार मंत्री संतोष गंगवार यांच्या आदेशानुसार यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. गणनेची तयारी तिच्यावर सोपवली आहे. समितीच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या. समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. एस.पी. मुखर्जी तर सह-अध्यक्ष प्रा.अमिताभ कुंडू आहेत.

श्रमगणनेबाबत आवश्यक 3 प्रश्न

सर्व्हेची गरज काय? : राज्य कामगार- व्यावसायिकांची माहिती देत नाहीत किंवा त्यात उशीर करतात.कायद्यात दुरुस्ती केल्यावर कामगार ब्युरोला यासाठी पूर्ण अधिकार दिले आहेत.

माहिती कोणती असणार : डॉक्टर-अभियंत्यापासून घरकामाचे नोकर, माळी आदी प्रत्येक व्यवसायात किती लोक आहेत. हे किती वेळ काम करतात आणि पैसा किती मिळतो हे कळेल.

याचा फायदा काय : सर्व व्यावसायिकांना सामाजिक सुरक्षा नेटवर्कशी जोडणार. या आकड्यांच्या आधारावर सरकारला आपल्या धोरणात अपेक्षित बदल करण्यात मदत मिळेल.

सध्या दर ६ महिन्यांनी गणना होईल

समितीचे सदस्य सह कामगार ब्युरोचे महासंचालक डीपीएस नेगी म्हणाले, गणना वैज्ञानिक सर्व्हेच्या आधारावर केली जाईल. सर्वेक्षणाच्या पद्धतीबाबत येत्या १५ दिवसांत स्पष्ट धोरण तयार होईल. सर्व्हेत जिल्हा स्तरावर कारखाने, कार्यालय, रुग्णालय आणि आरडब्ल्यूएसारख्या संस्थांतून व्यावसायिकांचा आकडा घेतला जाईल.

> आकडा जिल्हा स्तर, राज्य स्तर आणि केंद्रीय स्तरावर तयार होईल. सर्व्हे टीमचे प्रशिक्षण २ महिन्यांत होईल.

> कामगार ब्युरोचे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय सर्वेक्षणासाठी करारावरही भरती केली जाईल.

> जानेवारी- २०२१ पासून सर्वेक्षणाची सुरुवात होऊ शकते. सहा महिन्यांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...