आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना आमदारांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत सेनेचे जवळपास 25 आमदार गुजरातच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबल्याचा दावा केला जात आहे. या घटनाक्रमामुळे शिवसेनेला जबर हादरा बसला असला तरी आता सत्ताधाऱ्यांकडूनही भाजपचे आमदार फोडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे भाजपपुढे आपले आमदार एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्रातील आपल्या सर्वच 105 आमदारांना अहमदाबाद लगतच्या एका क्लबमध्ये हलवणार आहे. त्यांच्या मुक्कामाची जबाबदारी गुजरात भाजपच्या काही बड्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
आमदार एकजूट ठेवण्याचे आव्हान
एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे महाराष्ट्रातील मविआ सरकार संकटात सापडले आहे. हे सरकार अल्पमतात आले तर भाजपला सरकार स्थापन करण्याची सुवर्ण संधी आहे. पण, यासाठी प्रथम त्यांना आपले 105 आमदार एकजूट ठेवावे लागतील. यामुळे राज्यातील भाजपच्या सर्वच 105 आमदारांना एकत्र करून विशेष विमानाने अहमदाबाद एअरपोर्ट व तेथून थेट रिसॉर्ट किंवा क्लबमध्ये घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे. तूर्त, भाजपकडून सत्ताधाऱ्यांचे अधिकाधिक आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आमदार सायंकाळपर्यंत पोहोचणार
गुजरात भाजपच्या उच्चस्तरीय सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील भाजप आमदार मंगळवारी सायंकाळपर्यंत अहमदाबाद विमानतळावर पोहोचतील असा अंदाज आहे. त्यांना विमानतळावरुन चोख सुरक्षा व्यवस्थेत थेट पूर्वनियोजित ठिकाणी नेण्यात येईल. यासाठी केवळ एका रिसॉर्टची निवड करण्यात आली आहे. तिथे सर्वच 105 आमदारांना एकत्र ठेवले जाईल.
रिसॉर्टवर भाजपचे सर्वात विश्वासू नेते
'महाराष्ट्रातील भाजप आमदारांना कुठे ठेवायचे?' या मुद्यावर गुजरात व महाराष्ट्रातील भाजप नेत्यांत मंगळवार सकाळपासूनच सातत्याने दूरध्वनीवरुन संवाद सुरू आहे. त्यात अहमदाबादच्या साणंद लगतच्या एका हाय-प्रोफाइल क्लबची निवड करण्यावर मतैक्य झाले. या क्लबचे मालक भाजपचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत. या क्लबमध्येच भाजपचे आतापर्यंतचे अनेक कार्यक्रम व गुप्त मोहिमांची रणनिती ठरल्याचेही सांगण्यात येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.