आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने “बायोलॉजिकल-ई’च्या कॉर्बेव्हॅक्स लसीचे ५ काेटी डोस खरेदी करण्यासाठी मागणी नोंदवली आहे. ही लस याच महिन्यात देशात उपलब्ध होत आहे. कॉर्बेव्हॅक्सची किंमत देशात आतापर्यंत वापरात असलेल्या इतर कोणत्याही लसीपेक्षा स्वस्त असेल. या एका डोसची किंमत १४५ रुपये असून यावर जीएसटी वेगळा आकारला जाईल. सरकारने निश्चित केलेल्या केंद्रांवर कंपनी याच महिन्यात लसीचा पुरवठा सुरू करणार आहे.
आरोग्य मंत्रालयाचा उपक्रम एचएलएल लाइफकेअर लिमिटेडने यासाठी कंपनीला ७२५ कोटी रुपये दिले. गेल्या २ जूनला मंत्रालयाने बायोलॉजिकल-ईकडून लस खरेदी करण्यासाठी एचएलएलला १५०० कोटी रुपये दिले होते. कंपनीकडून ३० कोटी डोसची खरेदी केली जाणार आहे. सूत्रांनुसार, या लसीचा वापर १२ वर्षांवरील मुलांना डोस देण्यासाठी केला जाऊ शकतो. डीसीजीआयने कॉर्बेव्हॅक्सच्या कोव्हॅक्सिन व कोविशील्डमध्ये मिश्रण करून चाचणीस परवानगी दिली आहे.
सध्या सीरमकडून मिळणाऱ्या कोविशील्ड लसीच्या एका डोससाठी २१५ रुपये द्यावे लागतात. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची किंमत २६५ रुपये आहे. या लसीचे तीन डोस द्यावे लागतात. या प्रत्येक डोससाठी ९३ रुपयांचे अॅप्लिकेटरही घ्यावे लागते. भारतात कॉर्बेव्हॅक्स ही चौथी लस असून एक डोस १४५ रुपयांचा असेल. खासगी क्षेत्रासाठी याची किंमत किती असेल याचा निर्णय अद्याप झालेला नाही. खासगी रुग्णालयांत सध्या कोव्हॅक्सिनचा डोस १२०० रुपयांना, तर कोविशील्डचा एक डोस ७८० रुपयांना दिला जातो.
लसींची उत्पादनक्षमता
लस मासिक उत्पादन क्षमता
कोविशील्ड २५ ते २७ कोटी
कोव्हॅक्सिन ५ ते ६ कोटी
कॉर्बेव्हॅक्स ७.५ ते १० कोटी
झायकोव्ह-डी १ कोटी डोस
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.