आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्काराची कारवाई:हिजबुलचा कमांडर सैफुल्लाचा खात्मा, रियाज नायकू ठार झाल्यावर झाला होता हिजबुलचा प्रमुख

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही चकमक सुरू असताना काही स्थानिक लोकांची सुरक्षा दलांवर दगडफेक

जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत िहजबुल मुजाहिदीनचा प्रमुख कमांडर डॉ. सैफुल्ला ठार झाला. श्रीनगरच्या बाह्य भागात रंगरेथमध्ये ही चकमक झाली. दरम्यान, या वेळी अन्य एका अतिरेक्याला अटक करण्यात आली. घटनास्थळावरून एके-४७ रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले.

रंगरेथ भागात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी परिसराला वेढा दिला. सुरक्षा दलांनी घेरल्याचे लक्षात येताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. याच्या प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत सैफुल्ला मारला गेला. पोलिस महासंचालक विजयकुमार यांनी सांगितले की, ठार झालेल्या अतिरेक्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असले तरी आमच्या माहितीनुसार तो सैफुल्लाच असल्याचे स्पष्ट होत आहे.

स्थानिकांची दगडफेक

ही चकमक सुरू असताना काही स्थानिक लोकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. या वेळी केंद्रीय राखीव दलाने अश्रुधुराचा वापर करून या लोकांना हुसकावून लावले.