आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Children In The Village Were Unaware Of The Online Class, Then The 8th Grade Anamika Become Teacher; The Story Of A Girl Returning From A Hostel In A Lockdown

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्ट विचार:गावात मुले ऑनलाइन क्लासबद्दल अनभिज्ञ होती, मग 8 वीची अनामिका झाली शिक्षिका; लॉकडाऊनमध्ये होस्टेलहून परतलेल्या मुलीची कहाणी

आर. रामकुमार | पलक्कड8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13 वर्षांची अनामिका रोज गावात 30-40 मुलांना शिकवत आहे

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. दुर्गम भागांत तर मुले ऑनलाइन शिक्षणाबद्दल अनभिज्ञ आहेत. या स्थितीत गावातील मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे पाहून ८वीची विद्यार्थिनी अनामिका स्वत: त्यांची शिक्षिका झाली. केरळमधील पलक्कड जिल्ह्यात अटापाडी गावातील ही १३ वर्षांची अनामिका रोज गावात ३०-४० मुलांना शिकवत आहे.

अनामिका त्रिवेंद्रममध्ये जवाहर नवोदय विद्यालयात शिकते. लॉकडाऊनमध्ये ती गावात परतली. येथे आपला अभ्यास करण्यासाठी तिला गावात ना वीज होती, ना स्मार्टफोन ना टीव्ही. तिने पाहिले की ऑनलाइन शिक्षण नसल्याने तिच्या वयाची अनेक मुले अभ्यासापासून वंचित राहत आहेत. गावातील बहुतांश कुटुंबे तर स्मार्टफोनही खरेदी करू शकत नव्हती.

या स्थितीत अनामिकाने मुलांना शिकवण्याचा निश्चय केला. तिने वडिलांच्या मदतीने छोटी अभ्यासाची खोली तयार केली. ‘माझ्या गावचा स्मार्ट क्लास’ असे नाव तिने ठेवले. तिने मुलांना शिकवण्यास प्रारंभ केला. अनामिका म्हणते, लॉकडाऊनमुळे मुले शिक्षणापासून दुरावत चालले आहेत. हे मला पाहवले नाही. पापांच्या मदतीने मी एक वर्गखोली तयार केली आणि प्लास्टिकचा फळा तयार केला. सुरुवातीस मी मुलांच्या घरी जाऊन वर्गात येण्याचा आग्रह केला. हळूहळू मुले येऊ लागली. पहिली ते चौथीच्या मुलांना अनामिका शिकवत आहे. अनामिकाला इंग्रजी, मल्याळम, हिंदी, तामिळ आणि जर्मन भाषेचे ज्ञान आहे. ते ती शिकवत आहे. याशिवाय मुलांना योगासने, स्वच्छता आणि बागकाम याचेही शिक्षण ती देत आहे.

बातम्या आणखी आहेत...