आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लडाखमध्ये ‘चिनी कम’:चिनी लष्कराने लडाखच्या पँगाँग भागात 8 किमी भूभाग रिकामा केला

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिले छायाचित्र फिंगर-६चे (१८ फेब्रुवारीचे). येथे चिनी बंकर पाडलेले आहेत. दुसरे छायाचित्र जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यातील. यात चिनी लष्कर दिसते. - Divya Marathi
पहिले छायाचित्र फिंगर-६चे (१८ फेब्रुवारीचे). येथे चिनी बंकर पाडलेले आहेत. दुसरे छायाचित्र जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यातील. यात चिनी लष्कर दिसते.
  • चीनने प्रथमच कबुलीही दिली - गलवान खोऱ्यात आमचे 5 सैनिक ठार झाले

गलवानमधील रक्तरंजित संघर्षात आपले ५ सैनिक ठार झाल्याची कबुली चीनने प्रथमच दिली आहे. चिनी लष्कराचे वृत्तपत्र पीएलए डेलीने म्हटले की, ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन ऑफ चायनाने पाचही सैनिकांना मरणोत्तर सन्मानित केले आहे. ते जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात शहीद झाले होते.’ चिनी परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, चकमकीनंतर चीनने तणाव कमी करण्यासाठी संयम बाळगला, यामुळे मृतांची नावे जाहीर केली नाही. दुसरीकडे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले, चीनने दबावाखाली का असेना ५ सैनिकांची नावे तर सांगितली. मात्र त्यांनी सर्व नावे सांगितली नाही. कारण, त्या चकमकीत चीनचे ४० वर सैनिक ठार झाले होते.

चीनने बंकर, भारताने १९६२ ची पराभूत मानसिकता सोडली
भारत जेथून माघारी आला, ते पाॅइंट केवळ ३ तासांतच गाठता येऊ शकतात, उलट चिनी लष्कराला पुन्हा पोहोचण्यास १२ तास लागतील

लडाखमध्ये आॅपरेशन स्नो लेपर्डचा पहिला टप्पा पूर्ण झाला. पँगाँग सरोवराच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यावरून भारत-चीनचे लष्कर मागे आले आहे. येथील पाॅइंट्सवरच दोन्ही लष्करे आमनेसामने होती. कधीही युद्धाची ठिणगी झडू शकली असती. थोडक्यात, युद्धाचे संकट टळले, असे आपण आता म्हणू शकतो. भारताने आपल्या अटींवर चिनी लष्कराला माघार घ्यायला लावली, ही सर्वाेत्तम बाब आहे. चीनने प्रथमच लेखीत लष्करी माघारीच्या अटी मानल्या आहेत. त्यांनी आधी चिलखती वाहने, तोफा व रणगाडे हटवले. नंतर दोन्ही लष्करे उत्तर-दक्षिण टोकांवरून मागे गेली. शेवटी भारतीय लष्कर कैलाश रेंजहून मागे आले. आता शनिवारी दोन्ही लष्करांचे कमांडर बैठकीत देपसांग, गोगरा व हॉट स्प्रिंगच्या पेट्रोलिंग पॉइंट्सवर चर्चा करतील.

समझोत्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे गेल्या १० महिन्यांत आपण चीनला शिकवले आहे. एलएसीवर स्थिती बदलण्याचे त्यांचे मनसुबे फोल ठरले. कैलाश रेंजहून भारतीय सैन्य हटल्यानंतर चीन दगाबाजी करू शकतो, अशी शंका घेतली जात आहे. मात्र, मी दाव्यानिशी सांगू इच्छितो की दक्षिण पँगाँगमध्ये आपण मजबूत स्थितीत आहोत. कैलाश रेंजहून मागे येणे म्हणजे आपण तेथे पुन्हा पोहोचू शकत नाही, असे नव्हे. चीनने घोळ घातलाच तर भारतीय सैन्य तेथे ३ तासांत पोहोचू शकतात. चीनला पुन्हा पोहोचण्यासाठी १२ तास लागतील. चीनला मागे ढकलण्यात यशस्वी झाल्यानंतर आपण प्रथमच १९६२ च्या पराभूत मानसिकतेतून बाहेर आलो आहोत.

बातम्या आणखी आहेत...