आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Chinese Soldiers Are Not Accustomed To The Cold Of Ladakh, But The Indian Soldiers Are Ready To Stop At The Same Place

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिनी सैन्य हवामानापुढे असहाय्य:चिनी सैनिकांना लडाखच्या थंडीची सवय नाही, पण भारतीय सैनिक त्याच ठिकाणी थांबण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • PLA ला नाईलाजाने आपल्या सैन्याला दररोज स्थलांतरित करावे लागतेय

पूर्व लडाख क्षेत्रातील थंडीने पिपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ला रोटेशन पॉलिसी अवलंबण्यास भाग पाडले आहे. चिनी सैनिकांना लडाखच्या थंडीची सवय नसल्याने चीन दररोज आपल्या सैन्याच्या पुढच्या जागेवर फिरवत असतो. तर भारतीय सैनिक त्याच ठिकाणी दीर्घकाळ थांबण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.

वृत्त संस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भारतीय सैनिक चिनी सैन्यापेक्षा जास्त काळ लाइन ऑप अॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) वर फॉरवर्ड लोकेशनवर उभे राहील.

चीनी सैन्यावर हिवाळ्याचा अधिक प्रभाव

सुत्रांनुसार, हवामानाच्या बाबतीत भारताने चीनपेक्षा जास्त तयारी केली आहे. सियाचीन ग्लेशियर आणि लडाख सेक्टरच्या उंचीच्या भागात यापूर्वीच मोठ्या संख्येने भारतीय सैन्य तैनात आहेत. हिवाळ्याचा अधिक परिणाम चीनने भारतीय पोझिशनजवळ तैनात केलेल्या सैनिकांजवळ त्या उंच ठिकाणच्या भागात होणार आहे. दरम्यान भारतीय सैनिक तेथे तैनात असून, चीन आपल्या सैनिकांना दररोज तेथून हलवत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser