आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातच्या अमरेली जिल्ह्यात शियाल बेटचे लोक आजही वाहतुकीच्या आधुनिक साधनापासून वंचित आहेत. येथील लोक आजही आपला संदेश एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशी जुगाड वापरतात. येथील स्थानिक नागरिक कुटुंब प्रमुख घरी नाही हे सांगण्यासाठीही कलर कोडिंगचा वापर करतात. उदा. स्थानिक व्यक्ती जवळच्या राजुला गेला असेल तर घराच्या मुख्य दरवाज्याच्या कुलूपावर हिरवे कापड बांधले जाते. याच पद्धतीने जाफराबादला गेला असेल तर काळे कापड लावले जाते. समुद्रात मासे पकडणे व अन्य भागांत जाण्याच्या स्थितीत वेगवेगळ्या रंगाचे कपडे बांधले जातात. शियाल बेटावर मासेमार समाजाची लोकसंख्या आहे. साक्षरता दरही नगन्य आहे. वर्षातील ४ महिने पुरुष घरी व उर्वरित ८ महिने मासेमारीसाठी समुद्राच्या लाटांत असतात.
बेटापासून केवळ एक किमी दूर आधुनिक जीवनशैली...
येथील लोक अद्यापही नौका युगात राहतात. येथून केवळ १ किमी अंतरावर सुख-सुविधा उपलब्ध आहेत. शियाल बेटासमोरच्या किनाऱ्यावर पिपावाट बंदर आहे. तिथे जगातील आधुनिक तंत्रज्ञानासह विविध सुविधा आहेत.
मोबाइल व साक्षर नसल्यामुळे ही पद्धती अवलंबली
शियाल बेट व जवळच्या बेटांवर राहणाऱ्या लोकांनुसार, त्यांच्या उपजिविकेचा मुख्य आधारच नाव आहे. कमी साक्षरता आणि असण्यासोबत संपर्काचे साधन नसल्याने कुटुंबप्रमुख बाहेर असेल तर संदेश देण्यासाठी कुलूपाला विविध रंगाचे कापड बांधतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.