आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Company Said Customers' Financial Information Was Not Leaked, Security Related Incident Definitely Happened; News And Live Updates

डॉमिनोजमध्ये 18 कोटी ऑर्डरचा डेटा लीक:कंपनी म्हणाली - ग्राहकांची आर्थिक माहिती लीक झाली नाही; हॅकरने डार्क वेबवर तयार केले होते सर्च इंजिन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुबिलेंट फूडवर्क्स यांनी सुरक्षिततेशी संबंधित एक घटना घडली असल्याचे कबूल केले आहे

पिझ्झा ब्रँड डॉमिनोजच्या ग्राहकांचा डेटा लीक झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सायबर सुरक्षा संशोधक राजशेखर राजहरिया यांनी डॉमिनोज कंपनीतील 18 कोटी ग्राहकांचे डेटा झाल्याचे म्हटले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, हॅकरने डार्क वेबवर कंपनीशी संबंधित एक सर्च इंजिन बनवले होते. त्यामुळे सर्च इंजिनवर येणाऱ्या ग्राहकांचा डेटा हेरगिरीसाठी वापरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यवसायावर कोणताही परिणाम नाही
या घटनेची पुष्ठी देताना डॉमिनोजच्या मालकीची असलेली कंपनी जुबिलेंट फूडवर्क्सने सुरक्षिततेशी संबंधित एक घटना घडल्याचे कबूल केले आहे. कंपनीकडून कोणतीही आर्थिक माहिती किंवा क्रेडिट कार्ड डेटा संचयित करत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आर्डरचा डेटा लीक झाला नाही. या घटनेमुळे कंपनीच्या व्यवसायावर कोणताच परिणाम झाला नसून सदर घटनेचा तपास तज्ञांकडून केला जात असल्याचे कंपनीने म्हटले.

.

बातम्या आणखी आहेत...