आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Condition Of The Country Is Like A Kayak Floating In A Storm Without Knowing; PM Takes Credit When The Case Falls, Blaming The States If The Situation Worsens; News And Live Udpates

कोरोनावर राहुल गांधी म्हणाले:देशाची परिस्थिती नकळत वादळात तरंगणार्‍या बोटीप्रमाणे झालीये; कोरोना कमी झाला तर मोदी श्रेय घेतात, बिघडली तर राज्यांना दोष देतात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहे.

देशात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशात ऑक्सिजनसह अत्यावश्यक सामग्रींचा तुटवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल केला आहे. दरम्यान, राहुल गांधी म्हणाले की, कोरोनामुळे देशाची परिस्थिती ही नकळत वादळात तरंगणार्‍या बोटीप्रमाणे झाली असल्याचे ते म्हणाले. मोदी यांच्यावर टिका करताना ते म्हणाले की, जेव्हा देशात कोरोनाचा संसर्ग कमी होतो, तेव्हा आपले पंतप्रधान श्रेय घेतात आणि यामुळे परिस्थिती बिघडल्यास राज्यांना दोष देतात.

लसीकरणाच्या किंमतीवरुन
राहुल गांधी यांनी लसीच्या दरावरुन केंद्र सरकारला कटघर्‍यात उभे केले आहे. दरम्यान, त्यांनी सरकार लसीच्या दरांवरुन विचित्र वागणूक देत असून प्रथम लसीचा दर जाहीर केला जातो, त्यानंतर दबावानंतर तो कमी केला जात असल्याचे ते म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकार स्वतः ही लस 150 रुपये घेत इतरांना वाढीव दरात लस देत आहे. सरकार लोकांच्या डोळ्यात धूळ झाकत असल्याचे ही ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या वागणुकीवर

कोरोना संसर्गाच्या त्सुनामीसाठी केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी याच्या मते, मोदी सरकार अहंकारी असून वास्तवापासून दूर राहत केवळ समजुतींवर लक्ष असतो. पंतप्रधान हे केंद्र आणि वैयक्तिकृत सरकार चालवत असून ते त्यांच्या ब्रँडिंगमध्ये व्यस्त असल्याची टिका ही त्यांनी यावेळी केली.

बातम्या आणखी आहेत...