आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Convention Is Over, Politics Is Over; Opposition Groups Called For A Boycott Of The Assembly; News And Live Updates

...सभागृहातील गदारोळ रस्त्यावर:अधिवेशन संपले, राजकारण कायम; सभागृहातील गदारोळावर विरोधक आक्रमक, सरकारचा पलटवार

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला सुरक्षा रक्षकाची तक्रार - 2 महिला खासदारांनी गैरवर्तन केले

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेतील गदारोळ गुरुवारी रस्त्यावर आला. काँग्रेससह १२ विरोधी पक्षांनी सभागृहात खासदारांवर हल्ल्याचे गंभीर आरोप केले, तर सरकारने राज्यसभा टीव्हीच्या फुटेजचा हवाला देत पलटवार केला. तत्पूर्वी, विरोधक राज्यसभेच्या सभापतींना भेटले व विरोध माेर्चा काढला. दुसरीकडे, सरकारकडूनही केंद्रीय मंत्र्यांनी सभापतींची भेट घेऊन विरोधकांच्या वृत्तीची तक्रार केली.

मार्शल-खासदारांत झटापट
गुरुवारी जारी राज्यसभेतील गदारोळाच्या व्हिडिओत विरोधी खासदार आणि मार्शलमध्ये झटापट, धक्काबुक्की होत असल्याचे दिसते. विरोधकांना सभापतीच्या आसनापर्यंत जाण्यापासून रोखण्यासाठी मार्शलनी मानवी साखळी केली होती. मात्र िवरोधकांनी आरोप केला की सरकारने व्हिडिओचा निवडक भाग जारी केला. पूर्ण व्हिडिओ जारी केल्यास सत्य समोर येईल. दरम्यान, महिला सुरक्षा रक्षक अक्षिता भट्टने सुरक्षा संचालकांना पाठवलेल्या लेखी तक्रारीत आरोप केला की, २ महिला खासदारांनी हात पकडून आपल्याला ओढले. सुरक्षाकडे तोडावे म्हणून त्या दोन पुरुष सहकाऱ्यांची मदत करू पाहत होत्या.

विरोधकांनी आणखी विधेयके न आणण्याची धमकी दिली : केंद्र
आरोप व गदारोळाला प्रत्युत्तर देण्यासाठी गुरुवारी ८ केंद्रीय मंत्र्यांनी पत्रपरिषद घेतली. गदारोळाचा निषेध करत तो संसदेच्या पावित्र्यावरील हल्ला असल्याचे सांगितले. घटनादुरुस्ती विधयेकानंतर आणखी विधेयके आणू नका, अशी धमकी मंत्र्यांना मिळाल्याचा आराेप केंद्राने केला. मंत्री म्हणाले, विरोधकांचे वर्तन संसदीय इतिहासावर कलंक आहे.

पत्र परिषदेत राज्यसभेतील गटनेते व मंत्री पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नक्वी, प्रल्हाद जोशी, भूपेंद्र यादव, अनुराग सिंह ठाकूर, अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन उपस्थित होते. मंत्री म्हणाले, ‘विरोधक याला शोर्य संबोधत आहेत. सभागृह चालू नये, असा विरोधकांचा कट होता. त्यांनी देशाची माफी मागावी.’ संसदीय कार्य मंत्री जोशी म्हणाले, राहुल गांधी संसदेच्या कार्यवाहीला लोकशाहीची हत्या संबोधत आहेत. कार्यवाहीचा व्हिडिओ पाहून तेथे काय घडले, हे दिसते. काँग्रेस आणि सहकाऱ्यांनी संसद चालू न देण्याचा निर्णय घेतला होता. नियम तोडणाऱ्या खासदारांविरुद्ध सभापतींनी कठोर कारवाई करावी.

  • अनुराग ठाकूर : संसदेत जे काही घडले, त्यासाठी विरोधी पक्षांनी देशाची माफी मागावी. सडक ते संसदेपर्यंत अराजक निर्माण करणे, हा विरोधकांचा एकमेव अजेंडा होता.
  • देशाने विरोधकांवर विश्वास ठेवणे बंद केले आहे, हे सत्य विरोधक पचवू शकत नाही आहेत. विरोधकांची ‘होईल तर माझ्या पद्धतीने अन्यथा, कोणत्याही नाही’ ही भूमिका निषेधार्ह आहे. - पीयूष गोयल, राज्यसभेत पक्ष गटनेते

सभागृहात खासदारांना मारहाण हे पहिल्यांदाच : विरोधी पक्ष
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात संसदेपासून विजय चौकापर्यंत फलक घेऊन मार्च काढला. तेथे राहुल गांधी म्हणाले, संसदेत देशातील ६०% लोकांचा आवाज दाबण्यात आला, अपमानित करण्यात आले. हेरगिरीवर चर्चेची आम्ही मागणी केली, सरकारने नकार दिला. सभागृहात उपस्थित करू शकत नसल्याने आम्ही शेतकरी व महागाईचा मुद्दा बाहेर उपस्थित केला. विरोधकांना संसदेत बोलू दिले गेले नाही. ही ‘लोकशाहीची हत्या’ आहे. राहुल गांधींनी आरोप केला की, खासदारांना सभागृहात धक्काबुक्की करण्यात आली. त्यांना मारहाण झाली.

यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात विरोधी नेत्यांनी राज्यसभा सभापती व्यंकया नायडू यांची भेट घेतली. खरगे म्हणाले, घाईत विधेयक मंजूर केल्याची तक्रार करत १२ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यसभेत झालेल्या घटनेचा निषेध करणारे निवेदन सोपवले. यात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, सपाचे राम गोपाल यादव आणि आरजेडीचे मनोज झा यांचा समावेश होता.

  • आम्ही शेजारच्या देशातील मार्शल लॉ बाबत ऐकायचो, मात्र काल संसदेच्या आत हा लॉ पाहिला. आम्हाला संसदेत अनेक मुद्दे उपस्थित करायचे होते, मात्र सरकारने उपस्थित करू दिले नाहीत’ - मनोज झा, आरजेडी खासदार
  • संयुक्त निवेदन : राज्यसभेत जे घडले ते भयंकर, अनपेक्षित, दुःखद आहे. संसदेच्या सुरक्षेचा भाग नसलेल्या बाहेरच्या लोकांना सभागृहात आणण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...