आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Corona Graph In The Country Is Declining, But Another Wave Of Cold Is Expected

कोरोना:देशात कोरोनाचा आलेख घसरतोय, पण थंडीत दुसरी लाट येण्याची शक्यता; सरकारने केली अधिकृत घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थान, छत्तीसगढसह 5 राज्यांमध्ये सध्या केस वाढत आहेत

देशात कोरोनाची आलेख घसरतोय. सरकारने रविवारी याची अधिकृत घोषणा केली. तसेच थंडीमध्ये अधिक काळजी घेण्याची सूचना देखील केली आहे. 17 सप्टेंबर रोजी देशात सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या 10.17 लाख होती. त्यानंतर सातत्याने घट होत असून ती 7.83 लाखांवर पोचली आहे.

नीति आयोगाचे सदस्य व्हिके पॉल यांनी म्हटले की, गेल्या तीन आठवड्यांमध्ये देशातील जास्तीत राज्यांमध्ये कोरोना केस आणि महामारीमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट झाली आहे. मात्र थंडीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. पॉल, देशात महामारीवर उपाययोजना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कमेटीचे चीफ आहेत.

राजस्थान, छत्तीसगढसह 5 राज्यांमध्ये सध्या केस वाढत आहेत
पॉल म्हणाले की, जास्तीत जास्त राज्यांमध्ये महामारी स्थिर झाली आहे. मात्र पाच राज्य (राजस्थान, छत्तीसगढ, केरळ, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल) सह 3-4 केंद्र शासित प्रदेशांमध्येही केस वाढत आहेत. पॉल यांनी म्हटले की, भारत सध्या जगातील इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितित आहे, मात्र देशाला अजूनही मोठे प्रवास करायचा आहे. कारण 90% लोक अजूनही कोरोना व्हायरस संक्रमणासाठी अतिसंवेदनशील आहेत.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 74.92 लाख झाली आहे. आज हा आकडा 75 लाख पार होईल. देशात आतापर्यंत 65.94 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1.14 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 1031 रुग्णांचा मृत्यू झाला. 2 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदा एका दिवसात मृतांचा आकडा 1000 पार गेला.

बातम्या आणखी आहेत...