आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Corona Vaccine Is Not Expected To Arrive Before September 2021, McGill University Estimates; 28 Experts Who Developed The Vaccine Participated In The Survey

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सप्टेंबर 2021 च्या आधी कोरोना लस येण्याची शक्यता नाही, मॅकगिल विद्यापीठाने व्यक्त केला अंदाज; लस विकसित करणाऱ्या 28 तज्ज्ञांचा सर्वेक्षणात सहभाग

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • भारतात 2021 च्या पहिल्या तिमाहीत लस येण्याची अपेक्षा

कोरोना लस येण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज अमेरिकेतील काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. काेविड-१९ वरील प्रभावी लस पुढील वर्षाच्या सप्टेंबरआधी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध हाेण्याची शक्यता नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कॅनडातील मॅकगिल विद्यापीठातील संशाेधकांनी लस विकसित करण्यासाठी काम करत असलेल्या २८ तज्ज्ञांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात सहभागी झालेले बहुतांश तज्ज्ञ कॅनडा वा अमेरिकेतील शास्त्रज्ञ आहेत, ते गेल्या २५ वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत. मॅकगिल विद्यापीठातील प्राध्यापक जाेनाथन किम्मेलमॅन म्हणाले, लस उत्पादनाबाबत आमच्या सर्वेक्षणातील तज्ज्ञांनी केलेले अंदाज अमेरिकन सरकारी अधिकाऱ्यांनी २०२१ च्या सुरुवातीच्या मुदतीच्या तुलनेत बरेच अचूक आहेत.

अमेरिकेतील कार्नेगी मेलॉन विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक स्टीफन ब्रम्मेल म्हणाले की सरकार अतिआशावाद दाखवत आहे. मागील लसींच्या तुलनेत संशोधक कोविड लस त्वरेने तयार करीत आहेत. परंतु त्यांना वेळ लागेल.

रशियाने तयार केली कोरोना विषाणूची दुसरी लस

माॅस्काे | सर्वात आधी पहिल्या लसीची नाेंदणी करणारा रशिया आता आणखी एका लसीची नाेंदणी करण्यासाठी सज्ज आहे. रशिया १५ ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या लसीची नाेंदणी करण्याची शक्यता आहे. परंतु त्याला अधिकृत दुजाेरा मिळालेला नाही

रशियाने याआधी ऑगस्ट महिन्यात ‘स्पुटनिक व्ही’ या आपल्या व जगातील पहिल्या कोरोना लसीची नाेंदणी केली हाेती व त्यावरून बरेचसे वादंगही झाले हाेते. ‘एपीव्हॅककोरोना’ या दुसऱ्या लसीची नाेंदणी १५ ऑक्टोबरपर्यंत केली जाईल, असा दावा रशियातील ‘तास न्यूज’ने केला आहे. सैबेरियातील व्हेक्टर इन्स्टिट्यूट ही लस तयार करत असून गेल्या आठवड्यात मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. नवीन लसीचे दाेन भाग असून ते २१ दिवसांच्या अंतराने घ्यायचे आहेत. १० हजार डाेस तयार करण्याचा रशियाचा विचार असून त्याच्या उत्पादनाला नाेव्हेंबरमध्ये सुरुवात हाेऊ शकते. ही लस सुरक्षित व परिणामकारक असल्याचे व्हेक्टर लॅबचे मत आहे.

रशिया एपीव्हॅककोरोना ही दुसरी लस सैबेरियातल्या अत्यंत गुप्त अशा साेव्हिएत जैविक शस्त्र संशाेधन प्रकल्पामध्ये तयार करीत असून ही जगातील सगळ्यात अव्वल व्हायराॅलाॅजी इन्स्टिट्यूट आहे. व्हेक्टर हे याआधी साेव्हिएतच्या बेकायदेशीर जैविक शस्त्र उत्पादनाचे केंद्र हाेते.

भारतात २०२१ च्या पहिल्या तिमाहीत लस येण्याची अपेक्षा

दरम्यान, भारतातील तीन कंपन्या कोरोना विषाणूवरील लस तयार करण्यात कार्यरत असून त्यांच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यात सुरू असल्याचे वक्तव्य केंद्रीय आराेग्यमंत्री हर्षवर्धन काही दिवसांपूर्वी केले हाेते. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत कोरोनाची लस भारतात उपलब्ध होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला हाेता. दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या मते,जर सर्व काही व्यवस्थित झाले तर पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत कोरोनाची लस भारतीय बाजारात येईल. लस आल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येईल, परंतु साथीच्या रोगावर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यास दीड ते दोन वर्षे लागू शकतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...