आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Corona Virus Now Spreads Like A Spray From The Breath, Research By 17 Scientists

सावधान! मास्क वापरा:श्वासातून आता स्प्रेसारखा पसरताेय विषाणू, 17 वैज्ञानिकांचे संशोधन; नव्या अभ्यासातून हवेत विषाणूचा प्रभाव आणखी स्पष्ट झाला

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना फैलावण्याच्या कारणांवर जगभरात संशोधन होत आहे. विषाणू थंडीत जास्त प्रभावी राहील असे आधी मानले जात होते; पण १५ महिन्यांच्या कोरोना काळात संशोधनानंतर भारतीय वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे की, विषाणू उन्हाळ्यात वेगाने पसरत आहे. उष्णतेमुळे विषाणूच्या फैलावाची क्षमता वाढते, असे भारत सरकारच्या १७ वैज्ञानिकांच्या संशोधनात समोर आले. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) हैदराबादचे संचालक डॉ. राकेश के. मिश्रा यांनी सांगितले की, उष्णतेत श्वासाचे रूपांतर वेगाने वाफेत होते. त्यामुळे एखादी संक्रमित व्यक्ती श्वास सोडते तेव्हा विषाणूचे लहान-लहान कण तयार होतात. विषाणूचे अतिसूक्ष्म कण श्वासासोबत स्प्रेप्रमाणे वेगाने बाहेर येतात. नंतर बराच काळ हवेत राहतात. मास्क नसेल तर संसर्गाचा धोका असतो. खुल्या वातावरणात धोका कमी आहे. एखादा हॉल, खोली, लिफ्ट यात एखादी संक्रमित व्यक्ती शिंकली तरी तेथे संसर्गाची शक्यता जास्त वाढते.

कार्यालयात क्रॉस व्हेंटिलेशन नसेल तर फिजिकल डिस्टन्सिंग कुचकामी
विषाणू हवेतून पसरतोय?

नाही. सीसीएमबीचे माजी संचालक डॉ. सी. एच. मोहन राव यांच्या मते, विषाणू हवेत पसरतो, पण हवेमुळे पसरत नाही. उदा.संक्रमित व्यक्ती खोकली तर त्या २-३ मी. परिघात धोका, पण हा विषाणू भोपाळ वायू दुर्घटनेप्रमाणे नाही, तेव्हा वायू हवेमुळे पसरला.

हवेत विषाणू किती तास राहतो?
श्वासातून निघालेले विषाणूचे कण खूप लहान असतात, थंडीत जास्त काळ हवेत राहतात. उष्णतेत लवकरच नष्ट होतात. घरांत विषाणू हवेत २ तासांपर्यंत राहतो. व्हेंटिलेशन आवश्यक.

बंद खोलीत धोकादायक किती?
ज्या हॉलमध्ये कोविड रुग्ण राहिला असेल तेथे हवेत विषाणूचे कण २-३ मीटर कक्षेत राहतात. त्यामुळे घरात उपचार घेत असलेल्यांना हवेशीर खोलीत ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

मग संपूर्ण रुग्णालयातही असतो?
हे शक्य आहे. त्यामुळे कोविड रुग्णालये सामान्य रुग्णालयांपासून पूर्णपणे वेगळी असावीत, असा सल्ला आम्ही सरकारला दिला.

घरी प्रत्येकाने मास्क घालावा का?
घरात कुणी क्वॉरंटाइन असेल किंवा कोरोनाची लक्षणे असतील तर त्याच्यासाठी मास्क अनिवार्य. मग इतरांनीही मास्क घालावा.

कार्यालयांत धोका किती?
फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले, पण कार्यालय हवेशीर नसेल तर धोका अधिक. बंद ठिकाणी श्वासाद्वारे तो लोकांच्या शरीरात जातो.

संशोधन.... डॉ. राकेश मिश्रा, डॉ. शिवरंजनी, डॉ. टी. शरथचंद्र, डॉ. आरुषी गोयल, डॉ. भुवनेश्वर ठाकूर, डॉ. गुरप्रीतसिंग भल्ला, डॉ. दिनेश कुमार, डॉ. दिग्विजयसिंह नरुका, डॉ. अश्विनीकुमार, डॉ. अमित तुली, डॉ. स्वाती सुरावरम, डॉ. त्रिलोकचंद बिंगी, डॉ. श्रीनिवास एम., डॉ. राजा राव, डॉ. कृष्णा रेड्डी, डॉ. संजीव खोसला, डॉ. कार्तिक भारद्वाज.

बातम्या आणखी आहेत...