आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Corpse Was Lying On The Pyre So That The Private Parts Were Burnt First; News And Live Updates

घृणास्पद:दिल्लीत बलात्कारानंतर मुलीला जाळल्याची घटना; चितेवर उलटे होते प्रेत जेणेकरून प्रायव्हेट पार्ट आधी जाळले जावे

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्मशानभूमीच्या पुजाऱ्यावर आईचा होता विश्वास

दिल्लीतील जुणे नांगल गावात एक लाजीरवाणी घटना घडली आहे. येथील भाड्याच्या घरात राहणाऱ्या सुनील आणि सविता (नाव बदलले आहे) यांच्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केले. त्यानंतर आरोपीने 1 ऑगस्ट रोजी पीडीत मुलीची हत्या करत तीला जाळले. या घटनेनंतर प्रचंड खळबळ उडाली असून मुलीला न्याय मिळवण्यासाठी लोक आंदोलन करत आहे.

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पीडीत कुटुंबांला भेट त्यांचे सांत्वन केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी नांगल स्मशानभूमीतील एक पुजारी आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पुजारीसह 4 लोकांना अटक केली आहे.

मुलीशी संबंधित गोष्टी दाखवताना तिची आई सविता.
मुलीशी संबंधित गोष्टी दाखवताना तिची आई सविता.

पीडीताच्या कुटुंबांची पार्श्वभूमी काय?
पीडीत कुटुंब नांगल गावातील एका छोट्याशी घरात भाड्याने राहतो. दरम्यान, सुनील आणि सविता सकाळी लवकर उठून रद्दी उचलण्याचे काम करतात. त्यानंतर दिवसा येथील पीर बाबाच्या समाधीवर स्वच्छता करतात. येथे येणारे लोक त्यांना काही ना काही देतात, यामाध्यमातून त्यांचा पालनपोषण होतो.

सुनील आणि सविताच्या जीवनात आपली मुलगी केवळ एकच आशा होती. सविता आपल्या मुलीबद्दल नेहमी चिंतेत राहायची. तीच्या सोबत काही वाईट प्रसंग तर घडणार नाही ना याची तिला सतत काळजी वाटायची. या भीतीपोटी सविता आपल्या मुलीला शाळेतदेखील पाठवत नव्हती. पण दुर्दैव असं की, तीच्यासोबत प्रत्यक्षात असं घडलं.

दिल्ली कॅंटच्या नांगल गावातील या स्मशानभूमीत ही घटना घडली.
दिल्ली कॅंटच्या नांगल गावातील या स्मशानभूमीत ही घटना घडली.

घटनेच्या दिवशी काय घडले?
सविता सांगते, 'त्या दिवशी रविवार होता. माझी मुलगी 5:30 पर्यंत बिलकुल ठीक होती. तीचे बाबा भाजीपाला घेण्यासाठी बाजारात गेले होते. मी थडग्यावर जात असलेल्या भंडारावरून घरी आले होते. दरम्यान, पुजारी तेथे आला आणि तुमच्या मुलीला विजेचा धक्का लागल्याने तीचा मृत्यू झाला असे सांगितले.

गुडिया स्मशानात कशी गेली? हे विचारल्यावर आई सविता म्हणते की, 'माझी मुलगी रोज तिथे पाणी घ्यायला जायची.' मग ती रडायला लागली आणि म्हणाली, 'आधी तिला कधीच वीजेचा धक्का लागला नाही, मग आजच कसा काय धक्का लागला. स्मशानभूमीत पोहोचल्यावर माझ्या मुलीचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला जात होता.

मुख्य आरोपी स्मशानभूमीचे पुजारी आणि इतर काही लोक या खोल्यांमध्ये राहत होते.
मुख्य आरोपी स्मशानभूमीचे पुजारी आणि इतर काही लोक या खोल्यांमध्ये राहत होते.

सविता पुढे म्हणते की, 'मी पंडितांना सांगितले की मला माझ्या मुलीचा मृतदेह द्या, मग तो म्हणाला की, तुम्ही थडग्यावर भीक मागता, तुमच्याकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नाहीत. तुम्ही कसे कराल? पोलिस आल्यावर तुमच्या मुलीचे पोस्टमार्टम करेल असं पुजारीने सांगितले.

स्मशानभूमीच्या पुजाऱ्यावर आईचा होता विश्वास
सविता आपल्या मुलीला तिच्यापासून वेगळे होऊ देणार नव्हती. पण तिने स्मशानभूमीच्या पुजारीवर विश्वास ठेवला होता. ती मुलगी तिथे लावलेल्या वॉटर कूलरमधून पाणी आणायला जायची. कधी कधी मृत मुलगी पुजाऱ्याला चहा बनवून द्यायची. तीची आईदेखील तिकडेचे काम संपल्यावर कधी कधी स्मशानातील खोल्या स्वच्छ करायची. याबदल्यात पुजारी त्यांना काही खाद्यपदार्थ खायला देत असे.

मुलीला न्याय मिळावा यासाठी नांगल गावातील लोक आंदोलन करत आहे.
मुलीला न्याय मिळावा यासाठी नांगल गावातील लोक आंदोलन करत आहे.

पोलिसांनी आतापर्यंत काय केले?
सदरील घटनेत पोलिसांनी आतापर्यंत पुजारीसह 4 जणांविरोधात बलात्कार, खून आणि धमकी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, पॉक्सो कायदा आणि एससी-एसटी कायद्यांतर्गतही आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी आरोपींनी घातलेल्या कपड्यांपासून डीएनएचे नमुने घेण्यात आले आहेत. परंतु, मृतदेहाचे फक्त जळलेले अवशेष असल्याने कोणतेही ठोस निष्कर्ष काढता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...