आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅक्सिन अपडेट:देशाला मिळाल्या दोन लसी, राज्यांना मात्र एकच मिळणार; कोविशील्डचे 7.5 कोटी तर कोव्हॅक्सिनचे 1 कोटी डोस तयार

नवी दिल्ली / पवनकुमार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ किती प्रभावी, याचे सध्या पुरावे नाहीत

देशात कोरोना लसीची प्रतीक्षा संपली. ड्रग कंट्राेलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) रविवारी कोविशील्ड व कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. कोव्हॅक्सिन स्वदेशी लस आहे. तिची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. याआधीच तिच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. तिची निर्मिती करणारी कंपनी भारत बायोटेकने ती किती प्रभावी आहे हे सांगितलेले नाही, मात्र ती १००% सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लस टोचली जाईल. कंपन्यांना सांगण्यात आले आहे की, तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण करून अहवाल द्यावा, म्हणजे कायमच्या परवान्याचा निर्णय घेता येईल. डीसीजीआयने सांगितले की, दोन्ही लसींचे सामान्य किंवा किरकोळ दुष्परिणाम आहेत. जसे हलका ताप, अॅलर्जी आदी. मात्र दोन्ही लसी १००% सुरक्षित आहेत. नपुंसक होण्याची चर्चा निराधार आहे.

शक्यतो ज्या राज्यात कोविशील्ड पाठवली जाईल तेथे कोव्हॅक्सिन पाठवली जाणार नाही. यामुळे लसीकरणाच्या वेळी गोंधळ होणार नाही. यासाठी दोन-तीन दिवसांत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) ठरवली जाईल. मंजूर केलेल्या दोन्ही लसींचे दोन-दोन डोस दिले जातील. जुलैपर्यंत ३० कोटी लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.

कोव्हॅक्सिन : तिसऱ्या टप्प्यात २२ हजार जणांना लस दिली गेली, निकाल अद्याप बाकी
आयसीएमआरचे महासंचालक प्रा. बलराम भार्गव यांनी सांगितले, ‘लस पूर्णपणे सुरक्षित आहे. विषाणूत आतापर्यंत जेवढे बदल झाले आहेत त्या सर्वांवर काम करेल. किती प्रभावी हे अद्याप स्पष्ट नाही. प्राण्यांवरील संशोधनात पूर्णपणे प्रभावी दिसली. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ८०० जणांना लस दिली गेली. त्यातील कोणालाही कोरोना झाला नाही. तिसऱ्या टप्प्यात २२ हजार जणांना लस दिली. त्यांच्यात अद्याप दुष्परिणाम जाणवले नाहीत. अखेरचा निकाल येणे बाकी आहे.’

आता फक्त वृद्धांचे लसीकरण, नंतर १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांवर संशोधन केले जाईल
आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, कोविशील्डचे सुमारे ७.५ कोटी डोस आणि कोव्हॅक्सिनचे सुमारे १ कोटी डोस तयार आहेत. आयसीएमआरचे महासंचालक प्रा. बलराम भार्गव यांनी सांगितले, सध्या जगात वृद्धांनाच लस दिली जात आहे. नंतर १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांवर संशोधन होईल, निकाल आल्यानंतर या वयोगटातील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला जाईल.

कोविशील्ड : अर्धा डोस ९०% पर्यंत प्रभावी, दोन पूर्ण डोस ६२% परिणामकारक; सरासरी ७०%
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले, ‘सध्या आम्ही लस केवळ सरकारलाच देणार. आमच्याकडे पुरेशा लसी असतील तेव्हा आम्ही निर्यातही करू शकतो आणि बाजारातही देऊ शकतो. यात कोणतीही अडचण नाही. चाचणीत कोविशील्डच्या स्वयंसेवकास आधी अर्धा डोस, मग पूर्ण डोस देण्यात आला. अर्धा डोस ९०% प्रभावी राहिला. एक महिन्याने पूर्ण डोस देण्यात आला. दोन्ही पूर्ण डोस दिल्यानंतर प्रभाव ६२% राहिला. दोन्ही प्रकारच्या डोसमध्ये सरासरी प्रभाव ७०% असेल.’

बातम्या आणखी आहेत...