आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Country's Average Age Is 28, But The Chief Minister's Is 61; BJP's CM Is Younger Than Congress And Regional Parties

देश तरुणांचा, सत्ता ज्येष्ठांची:देशाचे सरासरी वय 28, मात्र मुख्यमंत्र्यांचे 61; काँग्रेस व प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत भाजपचे CM कमी वयाचे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात आणि हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच शपथ घेतली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ६० वर्षांचे असून राज्यातील नागरिकांचे सरासरी वय २९ वर्षे आहे. हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह ५८ वर्षांचे आहेत आणि राज्याचे सरासरी वय २८ आहे, म्हणजे जवळपास ३० वर्षांचे अंतर आहे. हे चित्र फक्त दोन राज्यांचेच नसून, ३० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे सरासरी वय ६१ आहे.

कोणत्याही राज्याचे सरासरी वयोमान ३५ वर नाही. ११ भाजप मुख्यमंत्र्यांचे सरासरी वय ५७ आहे, जे काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांच्या सरासरी वयापेक्षा कमी आहे. १७ व्या लोकसभा खासदारांचे सरासरी वय ५५ च्या जवळपास आहे. देशात सर्वाधिक सरासरी वय (३५) असलेल्या केरळात देशातील सर्वात वयस्कर (७७) मुख्यमंत्री आहेत. सर्वात कमी सरासरी वय (२२) असलेल्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे वय ७० पेक्षा अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...