आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजस्थानमध्ये देशातील पहिला जल बोगदा वापरासाठी सज्ज झाला आहे. डोंगराला पोखरून तो तयार करण्यात आला आहे. बोगद्यामुळे या क्षेत्रातील लोकांची तहान भागणार आहेच, त्याचबरोबर शेतीही डोलू लागेल. झालावाड, बारा, कोटा जिल्ह्यांत सिंचन व पेयजल सुविधेसाठी खानपूर भागातील अकावदा कला गावात परवन नदीवर बंधारा बांधण्यात येत आहे. बंधाऱ्यातून नहरीपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी ८.७ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. झालावाडच्या बृहद सिंचन योजनेचे अधिकारी के. एम. जायस्वाल म्हणाले, खोदकाम पूर्ण झाले आहे. आता लायनिंगचे काम सुरू आहे.
या बंधाऱ्यातून २ लाख १ हजार १६५ हेक्टर जमिनीचे सिंचन होईल. त्याचा लाभ १८२१ गावांना पेयजल सुविधेच्या माध्यमातून होईल. सोबतच ६३७ गावांत सिंचनासाठी पुरेसे पाणीही उपलब्ध होऊ शकेल. या जल बोगद्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी २९८.८८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सिंचनासाठी दोन कालवे तयार करण्यात आले आहेत. हा बोगदा बंधाऱ्याच्या उजव्या मुख्य कालव्याजवळ उभारली जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.