आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Country's First Private Nano Satellite Will Launch The Bhagavad Gita, A Portrait Of Prime Minister Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेन्नई:देशाच्या पहिल्या खासगी नॅनो उपग्रहातून अंतराळात जाईल भगवद्गीता, पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र

चेन्नई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) फेब्रुवारीच्या अखेरीस देशाचा पहिला खासगी नॅनो उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे. त्यातून भगवद्गीता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासह २५ हजार लोकांची नावे अंतराळात पाठवली जातील. हा नॅनो उपग्रह ‘स्पेसकिड्स इंडिया’ नावाची संस्था तयार करत आहे. ही संस्था विद्यार्थ्यांमध्ये अंतराळशास्त्राला चालना देण्यासाठी महान शास्त्रज्ञ सतीश धवन यांनी स्थापन केली होती.

स्पेसकिड्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केसन यांचे म्हणणे आहे की, जेव्हा आम्ही या मोहिमेला अंतिम रूप दिले तेव्हा लोकांना अंतराळात पाठवण्यासाठी नाव देण्याचे आवाहन केले. एका आठवड्यातच २५ हजार नावे प्राप्त झाली. ज्यांची नावे पाठवली जाणार आहेत त्यांना बोर्डिंग पासही दिला जाईल. टॉप पॅनलमध्ये पंतप्रधान मोदी यांचे नाव व त्यांचे छायाचित्र ठेवले आहे. इस्रोप्रमुख डॉ. के. सिव्हन व सचिव डॉ. आर. उमा महेश्वरन यांचेही नाव खाली पॅनलवर लिहिले आहे.