आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सी-प्लेन:नर्मदेत देशातील पहिल्या सी-प्लेन सेवेस येत्या एक नोव्हेंबरपासून होणार सुरुवात, पंतप्रधान माेदींच्या हस्ते लोकार्पण सोहळा

राजपिपला (नर्मदा)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1500 फूट उंचीवर उड्डाण घेण्यास सक्षम, 5 वेळा बदलले विमानाचे मालक

स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी आता हवाईमार्गे केवडियाला जाऊ शकाल. केवडिया ते अहमदाबाददरम्यान १३६ किमी अंतर सी-प्लेनने लवकर गाठता येईल. १ नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांसाठी ही सेवा सुरू होऊ शकते. यासाठी देशातील पहिले सी-प्लेन सोमवारी मालदीवहून कोची, गोवामार्गे केवडियात दाखल झाले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती ३१ ऑक्टोबर रोजी असून हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सी-प्लेन सेवेचे लोकार्पण होणार आहे. १९ प्रवासी क्षमता असलेले सी-प्लेन सरदार सरोवर नर्मदा धरणाजवळील तलाव क्रमांक ३ वर उतरवले जाणार आहे. यानंतर चाचणी उड्डाणासाठी २.३० वाजता रवानाही झाले. केवडियापासून (नर्मदा जिल्हा) साबरमती रिव्हर फ्रंट -अहमदाबादचे अंतर १३६ किमी आहे. सी-प्लेनद्वारे फक्त ४५ मिनिटांत हे अंतर गाठता येईल. सी-प्लेन हवाई ट्रीप दररोज सकाळी आठ वाजता अहमदाबादपासून सुरू होईल. दररोज सी-प्लेन हवाईमार्गे आठ ट्रीप पार पाडेल. यासाठी प्रतिव्यक्ती ४८०० रुपये तिकीट दर ठरवण्यात आले आहेत. या प्लेनमधून १४ प्रवासी जाऊ शकतील.

अहमदाबाद-केवडियादरम्यान उड्डाणासाठी आलेले सी-प्लेन ५० वर्षे जुने
गुजरातमध्ये अहमदाबाद-केवडियादरम्यान उड्डाण करणारे सी-प्लेन ५० वर्षे म्हणजे ५ दशके जुने आहे. कॅनडा-तुर्की-मालदीव आदी देशांत सेवा दिल्यानंतर आता अहमदाबादेत दाखल झाले आहे. स्पाइसजेटकडून ही सेवा सुरू राहणार आहे. या सी-प्लेनची निर्मिती १९७१ मध्ये कॅनडात झालेली आहे. कंपनीने याची पहिली डिलिव्हरी कॅनडातील कॅनडाच्या ओट्टावा रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांना दिली. तेव्हापासून आजवर याचे तीन मालक बदलले आहेत. यांची नोंदणी मालदिवियन एअरलाइन्सकडे आहे. २०१६ मध्ये ८ ऑगस्ट रोजी मालदिवियन एअरलाइन्सने हे विमान विकत घेतले होते.

उत्तम स्थितीत आहे सी-प्लेन : स्पाइसजेट
५० वर्षे जुन्या सी-प्लेनच्या सुरक्षेसंबंधी भास्करच्या प्रश्नांना उत्तरे देताना स्पाइसजेट प्रवक्त्यांनी सांगितले, हे सी-प्लेन सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक आहे. याची दुरुस्ती व देखभाल योग्य व नियमितपणे झाली आहे आणि ते उत्तम स्थितीत आहे. स्पाइसजेटला आपले प्रवासी, क्रू आणि विमानाची सुरक्षा खूप महत्त्वाची वाटते. दिव्य मराठी नेटवर्कने गुजरात सरकारमधील संबंधित खात्याचे मंत्री भूपेंद्रसिंग चुडासामा, हवाई वाहतूक विभागाच्या सचिव ममता वर्मा व गुजरात स्टेट एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर लि.चे सीईओ अजय चौहान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.

६ महिने परदेशी पायलट्सकडून प्रशिक्षण
सी-प्लेन उड्डाणासाठी सहा महिन्यांपर्यंत परदेशी पायलट्सकडून भारतीय पायलट्सना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सी-प्लेनसाठी साबरमती रिव्हरफ्रंट-अहमदाबाद येथे तसेच नर्मदा धरण, सरोवर संख्या ३ केवडिया येथे वॉटर रन-वे तयार करण्यात आले आहेत.