आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MPत तयार झाला देशाचा सर्वात मोठा बॉम्ब:पाकिस्तानी विमानतळ किंवा बंकर क्षणार्धात उडवून देईल, सुखोई व जग्वार सारख्या लढाऊ विमानांत सहजपणे होईल फिट

जबलपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूरच्या खमरिया आयुध निर्माण कारखान्याने (ओएफके) तब्बल 500 किलो वजनाचे बॉम्ब (General Purpose Bomb)तयार केलेत. हे बॉम्ब आकाशातून टाकल्यानंतर सहजपणे कितीही मोठे बंकर उद्ध्वस्त करु शकतात. विशेषतः पाकचे कोणतेही विमानतळ क्षणार्धात उडवण्याची ताकद या बॉम्बमध्ये असल्यामुळे भारताच्या मारक क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. ओएफकेला पोहोचलेले हवाई दलाचे एक पथक शुक्रवारी हे 48 बॉम्ब घेऊन आपल्या तळाकडे रवाना झाले. या बॉम्बची संपूर्ण डिझाईन व निर्मिती ओएफकेत तयार झाली आहे. त्यामुळे ही या आयुध निर्माण फॅक्ट्रीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. OFK चे महाव्यवस्थापक एस.के.सिन्हा यांच्या मते 500 किलोच्या या बॉम्बमुळे हवाई दलाची ताकद कैकटीने वाढेल.​​​​​​​

GP बॉम्बची पहिली खेप शुक्रवारी हवाईदलाला पाठवण्यात आली.
GP बॉम्बची पहिली खेप शुक्रवारी हवाईदलाला पाठवण्यात आली.

देशाचा सर्वात मोठा बॉम्ब

फॅक्ट्रीच्या सूत्रांनुसार, हा भारताचा सर्वात मोठा बॉम्ब आहे. त्याची लांबी 1.9 मीटर, तर वजन 500 किलो आहे. हा बॉम्ब जग्वार व सुखोई-30 एमकेआय सारख्या विमानातंून सहजपणे टाकता येतो. त्याची निर्मिती जबलपूरच्या आयुध निर्माण फॅक्ट्रीच्या एफ-6 सेक्शनमध्ये झाली आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

  • या GP बॉम्बच्या स्फोटामुळे संपूर्ण विमानतळ उद्ध्वस्त करता येते.
  • त्याचा वापर रेल्वे रुळ व मोठे पूल उडवून देण्यासाठीही करता येईल.
  • या बॉम्बमध्ये बंकर्स उद्ध्वस्त करण्याचेही विशेष तंत्रज्ञान आहे.

10,300 स्टील बुलेट्सचा बॉम्ब

  • 500 किलोच्या या बॉम्बची लांबी 1.9 मीटर आहे.
  • एका बॉम्बमध्ये 15 मिमि. चे 10300 बुलेट्स असतील.
  • स्फोटानंतर एक बुलेट्स 50 मीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेईल.
  • प्रत्येक बुलेट 12 एमएमची स्टील प्लेट भेदण्यास सक्षम आहे.
  • हा बॉम्ब जग्वार व सुखोई -30 विमानावर सहजपणे फिट करता येतो.

DRDO ने विकसित केले तंत्रज्ञान
संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ)ने हा बॉम्ब विकसित केला आहे. प्रत्येक बॉम्बमध्ये 15-15 एमएमचे 10,300 स्टीलचे गोळे (बुलेट्स) आहेत. स्फोटानंतर ते 50 मीटरपर्यंतचे लक्ष भेदतील. विशेष म्हणजे ते 12 एमएमची स्टील प्लेटही सहजपणे भेदू शकतात. यामुळे भारताच्या सामरिक ताकदीत मोठी वाढ होईल. हा बॉम्ब भारताला युद्धात विजयच मिळवून देणार नाही तर यामुळे देशाची राष्ट्रीय सुरक्षाही अधिक मजबूत होईल.

GP बॉम्बविषयी जाणून घ्या

GP बॉम्ब बॉम्बफेकी विमानांत अपलोड केला जातो. त्याचा वापर शत्रूला अधिकाधिक नुकसान पोहोचवण्यासाठी केला जातो. हे बॉम्ब शत्रू सैनिक, वाहने व इमारतींना नष्ट करण्यासाठी तयार करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हे बॉम्ब सामान्यतः टीएनटी, कंपोजिशन बी किवा ट्रायटोनलसह एक मोठी भींत असणाऱ्या धातूच्या आच्छादनाने झाकलेले असतात. याचा भार बॉम्बच्या एकूण वजनाच्या 30 ते 40 टक्के असतो.

48 बॉम्बची पहिली खेप रवाना

ओएफकेच्या महाव्यवस्थापकांनी शुक्रवारी 48 बॉम्बच्या पहिल्या खेपीला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी बोलताना आयुध निर्माण कर्मचाऱ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे ते म्हणाले. DGQA चे कमांडिंग ऑफिसर आर.आर. पंत, अतिरिक्त महाव्यवस्थापक अशोक कुमार, शैलेश वगरवाल, विकास पुरवार, संयुक्त महाव्यवस्थापक वाय.के. सिंह, उप महाव्यवस्थापक दिनेश कुमार यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...