आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Country's Largest Team In The Paralympics; Will Play A Female Shooter For The First Time; News And Live Updates

टोकियो पॅरालिम्पिक 2020:पॅरालिम्पिकमध्ये देशाचा सर्वात मोठा संघ; प्रथमच महिला नेमबाज खेळणार; 24 ऑगस्टपासून स्पर्धेत आपले 54 खेळाडू खेळणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वाधिक 24 खेळाडू अॅथलेटिक्सचे, त्यात आठ भालाफेकपटू आहेत

टोकियो पॅरालिम्पिक २०२० स्पर्धेला केवळ ५ दिवस शिल्लक आहेत. २४ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या स्पर्धेत भारताचे ५४ खेळाडू सहभागी होतील, ज्यात ४० पुरुष व १४ महिला खेळाडू आहेत. हा पॅरालिम्पिकमधील भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ ठरला. रिओमध्ये १९ खेळाडू उतरले होते व २ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्यपदक जिंकले होते. ही भारताची आतापर्यंतची उत्कृष्ट कामगिरी होती. भारताचे खेळाडू ९ खेळांत उतरतील.

आपले सर्वाधिक खेळाडू अॅथलेटिक्समध्ये (२४) खेळतील. रिओ पॅरालिम्पिक २०१६ चा सुवर्ण विजेता उंच उडीपटू मरियप्पन थंगावेलू स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक असेल. भारताला सर्वाधिक अपेक्षा भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया, संदीप चौधरी व मरियप्पनकडून आहेत. झाझरियाने २००४ व २०१६ मध्ये सुवर्ण जिंकले हाेते व संदीप जागतिक विजेता आहे. भारतीय चाहते डीडी स्पोर्ट‌्सवर पॅरालिम्पिक पाहू शकतील.

प्रथमच भारताच्या महिला नेमबाज खेळतील
पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच भारतीय महिला नेमबाज सहभागी होणार आहेत. रुबिना फ्रान्सिस १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ व अवनी लेखरा ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच १ व ५० मीटर रायफल प्रोन एसएच १ मिश्र प्रकारात खेळेल. १९ वर्षीय बॅडमिंटनपटू पलक कोहली युवा खेळाडू असेल. सर्वाधिक ८ खेळाडू भालाफेकचे खेळतील.

बॅडमिंटन व तायक्वांदोचे पदार्पण होणार
पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच बॅडमिंटन व तायक्वांदोचा समावेश करण्यात आला. हरविंदर सिंग व विवेक चिकारा स्पर्धेसाठी पात्रता मिळवणारे पहिले तिरंदाज असतील. प्राची यादव भारताची पहिली पॅरा-कोनोइस्ट ठरेल. तायक्वांदोमध्ये अरुणा तंवर खेळेल.

मी स्वत:ला सक्षम मुलापेक्षा वेगळे समजले नाही
तामिळनाडूचा मरियप्पन ५ वर्षांचा होता, तेव्हा ट्रक अपघातात त्याने पाय गमावला. लहानपणी त्याला व्हॉलीबॉल खेळायला आवडत हाेते. एकदा शिक्षकाने त्याला उंच उडी मारण्याचा सल्ला दिला. मरियप्पनने वयाच्या १४ व्या वर्षी उंच उडी स्पर्धेत सहभाग घेतला व तोही सामान्य खेळाडूबरोबर. तो दुसऱ्या स्थानी राहिला. मरियप्पन म्हणतो - मी स्वत:ला कधीही सक्षम मुलांपेक्षा वेगळे समजले नाही. २०१३ मध्ये राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्समध्ये प्रशिक्षक सत्यनारायण यांनी मरियप्पनची गुणवत्ता हेरली व त्याला प्रशिक्षणासाठी बंगळुरूला घेऊन गेले. येथून मरियप्पनच्या व्यावसायिक क्रीडा कारकीर्दीला सुरुवात झाली.

स्पर्धेत ५४० प्रकार होतील
पॅरालिम्पिकमध्ये १३६ देशांचे ४४०० खेळाडू सहभागी होतील. १३ दिवस चालणाऱ्या स्पर्धेत २२ खेळांचे ५४० प्रकार होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...