आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Court's Decision On Pilot's Petition On July 24, Instructed The Speakers Not To Take Action Until Then

राजस्थान सत्तासंघर्ष:पायलट यांच्या याचिकेवर कोर्टाचा 24 जुलैला निकाल, तोपर्यंत कारवाई न करण्याचे सभापतींना निर्देश

जयपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशोक गहलोत यांच्या ओएसडींची सीबीआयकडून चौकशी

काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक १८ आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालयाने मंगळवारपर्यंत निकाल राखून ठेवला. २४ जुलैला निकाल दिला जाईल. न्यायालयाने संबंधित आमदारांवर २४ जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने याबाबत सर्व वादी आणि प्रतिवादी यांच्याकडून शुक्रवारपर्यंत लेखी म्हणणे मागवले आहे.

यापूर्वी सुनावणीदरम्यान सचिन पायलट गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, नोटिशीला उत्तर देण्यासाठी आमदारांना मुद्दाम कमी वेळ देण्यात आला. काँग्रेसने ज्या दिवशी तक्रार केली त्याच दिवशी सभापतींनी अपात्रतेची नोटीस बजावली. नोटीस बजावण्याचे कारणही सांगण्यात आले नाही. काँग्रेसच्या तक्रारीवरून सभापतींनी १४ जुलैला पायलट आणि त्यांच्या समर्थक १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. या नोटिसांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

अशोक गहलोत यांच्या ओएसडींची सीबीआयकडून चौकशी

चुरूतील राजगडमध्ये तैनात एसएचओ विष्णुदत्त विष्णोई यांच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआयने मंगळवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे ओएसडी देवालाल सैनी यांची चौकशी केली. सूत्रांनी सांगितले की, दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या पथकाने जयपूरमध्ये सैनी यांचा जबाब घेतला. सोमवारी काँग्रेस आमदार कृष्णा पुनिया यांची चार तास चौकशी करण्यात आली होती. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित पुनिया यांची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते. विष्णोई २३ मे रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. त्यांचा मृत्यू संशयास्पद ठरला होता.