आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोव्हॅक्सिनची क्षमता पडताळण्यासाठी चाचण्या:कोव्हॅक्सिन लस 81 टक्के प्रभावी; भारत बायोटेक कंपनीकडून दावा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात कोरोना लसीसाठी घेतलेल्या चाचण्यांतील ही सर्वात व्यापक चाचणी होती.

कोरोनावरची अापली कोव्हॅक्सिन लस ८१% प्रभावी ठरल्याचा दावा हैदराबादच्या कंपनी भारत बायोटेकने बुधवारी केला. कोव्हॅक्सिनची क्षमता पडताळण्यासाठी कंपनीने तिसऱ्या टप्प्यात चाचण्या घेतल्या होत्या. १८ ते ९८ वर्षांपर्यंतच्या २५८०० लोकांवर या चाचण्या करण्यात आल्या. यात २४३३ लोकांचे वय ६० हून अधिक होते, तर ४५०० लोकांना गंभीर आजार होते.

भारतात कोरोना लसीसाठी घेतलेल्या चाचण्यांतील ही सर्वात व्यापक चाचणी होती. आयसीएमआरच्या सहकार्याने या चाचण्या करण्यात आल्या होत्या. भारत बायोटेकचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक कृष्ण एला म्हणाले, “लसीच्या शोधकार्यात आजचा दिवस एक मैलाचा दगड ठरला आहे. आम्ही आतापर्यंत तीन टप्प्यातील चाचण्यांचा डाटा जाहीर केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत तो अधिक प्रभावी असल्याचे स्पष्ट होत आहे. नव्याने येत असलेल्या विषाणूंशी लढण्याच्या दृष्टीने हे कोव्हॅक्सिन अत्यंत प्रभावी आहे.’

कंपनी सूत्रांनुसार, सुमारे ४० देशांनी कोव्हॅक्सिन खरेदी करण्याची इच्छा प्रदर्शित केली अाहे. देशात कोरोनापासून बचावासाठी कोव्हॅक्सिनशिवाय ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची कोविशील्ड लसही वापरली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...