आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Crisis Of Humanity During The Corona Epidemic, So The Buddha's Thoughts Are Useful To Us Prime Minister Modi

गुरु पौर्णिमा:कोरोना महामारीच्या काळात मानवतेचे संकट, म्हणून बुद्धांचे विचार आपल्यासाठी उपयुक्त - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींच्या संवादातील महत्वाचे मुद्दे

कोरोना महामारीच्या काळात मानवतेचे सर्वात मोठे संकट उभे राहिले असून यात बुद्धांचे विचार आपल्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते आज शनिवारी गुरु पौर्णिमाच्या पार्श्वभूमीवर आषाढ पौर्णिमा-धम्म च्रक दिवसाच्या कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, अशा परिस्थितीत भगवान बुद्ध आपल्यासाठी अधिक प्रासंगिक बनतात. बुद्धाच्या मार्गावर चालून आपण सर्वात मोठ्या आव्हानांना तोंड देऊ शकतो. कारण भारताने कोरोना महामारीच्या काळात तसे करुन दाखवले आहे. आज जगातील अनेक देशही बुद्धांच्या योग्य विचारांबद्दल एकमेकांचा हात धरुन चालत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

मोदींच्या संवादातील महत्वाचे मुद्दे

बुद्धांनी आपल्याला संपूर्ण जीवनाचे सूत्र सांगितले
मोदी म्हणाले की, सारनाथमध्ये बुद्धांनी आपल्याला संपूर्ण जीवनाचे पूर्ण ज्ञान देण्याचे सूत्र सांगितले होते. त्यांनी आम्हाला दु:खाबद्दल सांगितले. दु:खाचे कारणाबद्दल सांगितले असून त्यावर मात करत विजयाचा मार्ग कसा तयार करायचा हे देखील सांगितले आहे.

संतुलनाने आनंद मिळवता येतो
बुद्धाने आपल्याला आयुष्या जगण्यासाठी आठ सूत्र दिले आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी म्हणजे मनाची एकाग्रता. आपल्या आयुष्यात संतुलन असेल तरच आंनद मिळू शकतो असे मोदी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...