आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणूक आयोगाला आणखी एक झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टासह उच्च न्यायालयांत आयोगाची बाजू मांडण्यासाठी वकिलांच्या पॅनलचे सदस्य मोहित डी. राम यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी शुक्रवारी आयोगाच्या विधी विभागाच्या संचालकांना राजीनामा पाठवला. त्यात त्यांनी म्हटले की, ‘निवडणूक आयोगाची सध्याची कार्यशैली आणि माझ्या मूल्यांत ताळमेळ बसत नाही आहे. यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे.’ मोहित २०१३ पासून सुप्रीम कोर्ट व इतर उच्च न्यायालयांत निवडणूक आयोगाची बाजू मांडत होते.
मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगावर ओढले होते ताशेरे
मद्रास हायकोर्टाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी आयोगाला जबाबदार धरले हाेते. कोर्ट म्हणाले हाेते, आयोगाने महामारीच्या काळात ५ राज्यांत विधानसभा निवडणुका घेतल्या. त्यात कोरोना प्रतिबंधक उपायांचे पालनही केले नाही. यामुळे लाखांेचा जीव धाेक्यात सापडला. अायोगाच्या अधिकाऱ्यावर यासाठी हत्येचा खटला चालवायला हवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.