आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Daughter Of Prayagraj Violence Mastermind Wrote Lynchistan In Twitter Bio, Latest News And Update

जावेदच्या मुलीने ट्विटरवर लिहिले -लिंचिस्तान:आफरीनने अफजल गुरूला म्हटले होते निर्दोष, CAA - NRC आंदोलनात आले होते नाव

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयागराज हिंसाचाराचा मास्टरमाइंड जावेद अहमद उर्फ जावेद पंपच्या घरावर बुलडोझर चालला, तेव्हा ट्विटरवर अचानक JNU ट्रेंड झाले. त्याचे झाले असे की, बुलडोझरच्या कारवाईनंतर जेएनयूत सायंकाळी जावेदची मुलगी आफरीन फातिमाच्या समर्थनार्थ निदर्शने झाली. आफरीन दिल्लीत राहून शिक्षण घेते. ती अलीगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणजे एएमयू महिला कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेची माजी अध्यक्षा आहे. ट्विटरवरील बायोत जिथे लोकेशन लिहिले जाते, तिथे तिने 'लिंचिस्तान' असे लिहिले आहे.

चला जाणून घेऊया आफरीनची पार्श्वभूमी...

आफरीन शिक्षणाहून जास्त वादात

आफरीन ही जावेद अहमद यांची मोठी मुलगी आहे. ती जेएनयूतील विद्यार्थी संघटनेची काउंसलर आहे. यापूर्वी तिने एएमयूतून बीए ऑनर्स व एमए केले आहे. पण, ती शिक्षणापेक्षा वादातच जास्त राहिली. तिच्याशी संबंधित काही वादावर दृष्टिक्षेप टाकूया...

  • आफरीन 2019 मध्ये CAA-NRC निदर्शनावेळी JNU पासून प्रयागराजपर्यंत सक्रिय होती.
  • शाहीन बाग येथील आंदोलनात आफरीन सक्रिय होती. ती या आंदोलनाच्या कटाचा मास्टरमाइंड शरजील इमामची निकटवर्तीय असल्याचा संशय आहे.
  • हिजाब बंदीवेळी आफरीन दक्षिण भारतात गेली, तिथे तिने अनेक शहरांतील निदर्शनांत सहभाग घेतला.
  • आफरीनने 2001 च्या संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अफजल गुरूचा उल्लेख निर्दोष म्हणून केला होता.
आफरीन ट्विटरवर खूप सक्रिय आहे. तिचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
आफरीन ट्विटरवर खूप सक्रिय आहे. तिचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

2 वर्षांपूर्वी जनतेची माथी भडकावण्याचा प्रयत्न

जानेवारी 2020 मध्ये CAA-NRC विरोधात दिल्लीत तीव्र निदर्शने झाली. तेव्हा 25 जानेवारी 2020 रोजी 45 सेकंदांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात आफरीन केंद्र सरकार व सुप्रीम कोर्टाविरोधात जनभावना भडकवण्याचा प्रयत्न करताना दिसून आली.

हे छायाचित्र ऑगस्ट 2021 चे आहे. तेव्हा आफरीनने इंटरनेटवरील 'सुल्ली डील्स' प्लॅटफॉर्मवर मुस्लिम महिलांच्या शोषणाविरोधात निदर्शने केली होती.
हे छायाचित्र ऑगस्ट 2021 चे आहे. तेव्हा आफरीनने इंटरनेटवरील 'सुल्ली डील्स' प्लॅटफॉर्मवर मुस्लिम महिलांच्या शोषणाविरोधात निदर्शने केली होती.

व्हिडिओमध्ये आफरीन म्हणाली होती की, 'मला वाटते सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय मुस्लिमांसाठी विश्वासार्ह नाही. हे तेच सर्वोच्च न्यायालय आहे ज्याने यापूर्वी बाबरी मशिदीच्या खाली मंदिर नाही असे सांगितले होते.' हा व्हिडिओ भाजयुमोचे नेते पी.एम. साई प्रसाद यांनी शेअर केला आहे.

माझ्या कुटुंबाला फसवले जात आहे: आफरीन

आफरीनने तिच्या कुटुंबावर केलेली कारवाई चुकीची असल्याचा दावा केला आहे. आफरीन म्हणाली, 'पोलिसांना माझ्यावर संशय असेल त्यांनी माझे सोशल मीडिया अकाउंट पडताळून पहावे. त्यात तुम्हाला काहीच आक्षेपार्ह सापडणार नाही. माझ्या कुटुंबाला नाहक गोवले जात आहे.' प्रयागराजमधील त्यांच्या भागातून मुस्लिम महिला व लहान मुलांना जबरदस्तीने घराबाहेर काढले जात असल्याचा आरोपही तिने यावेळी केला.

पोलिसांचा दावा -दगडफेकीपूर्वी आफरीनने जावेदला दिला सल्ला

प्रयागराज हिंसाचारामागे जावेद अहमदचा हात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्याने स्थानिकांना हिंसाचारासाठी चिथावणी दिली होती. तत्पूर्वी, आफरीनने फोनवरुन त्यांना यासंबंधी सल्ला दिला होता. पोलिस याचा तपास करत आहेत. त्यात ती दोषी आढळली तर दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून तिला ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती प्रयागराज एसएसपी अजय कुमार यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...