आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Daughter Of The Chief Justice In charge Of The High Court Murdered Her Lawyer Priyakar After Her Private Photo Went Viral.

प्रेमकहाणीचे रूपांतर शत्रुत्वात:न्यायमूर्तीच्या मुलीने प्रियकराची घडवून आणली हत्या, खासगी फोटो व्हायरल केल्याने राग

चंदीगड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगडच्या तरुण वकिलाची सप्टेंबर २०१५ मध्ये गोळ्या झाडून हत्या झाली, पण ६ वर्षे ९ महिने तपास यंत्रणांना समजलेच नाही की ती का झाली? कुणी केली?… मरण पावलेला सुखमनप्रीत सिद्धू उर्फ सिप्पी हादेखील राष्ट्रीय नेमबाज होता. त्याला मारणे सोपे नव्हते.

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती सबिना यांची कन्या, सिप्पीची मैत्रीण असलेल्या कल्याणीकडे पोलिसांच्या संशयाची सुई वारंवार वळत होती. हत्या झाली तेव्हा सबिना या पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होत्या. एप्रिल २०१६ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे साेपवण्यात आले. त्यांच्या हातीही ५ वर्षे काहीच लागले नाही. त्यांच्या आरोपपत्रातही अज्ञात व्यक्ती मारेकरी असल्याचे म्हटले. हे सिप्पींच्या कुटुंबाला मान्य नव्हते.

ते पहिल्या दिवसापासून कल्याणी हीच मारेकरी असल्याचे सांगत होते. त्यांनी ‘जस्टिस फॉर सिप्पी’ मोहीम राबवली. दबाव वाढताच सीबीआयने तपासाला गती दिली. या दुसऱ्या टप्प्याने तपासाची दिशा बदलली. ज्या दिवशी हत्या झाली, त्याच दिवशी सिप्पी कल्याणीला भेटला होता. सलग तीन दिवस ते भेटत होते. दोघांमध्ये वाद होता. तो काय होता, यावर लक्ष केंद्रित करताना सीबीआयला त्यांचे प्रेमप्रकरण समजले.

दाेघांना लग्न करायचे होते, पण सिप्पीच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. अन‌् सिप्पी यांना घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जायचे नव्हते. दरम्यान, दाेघांच्या खासगी क्षणांच्या क्लिपिंग्ज कल्याणीच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचल्या. हेे सिप्पीने केल्याचा कल्याणीचा समज झाल्याने प्रेमाचे रूपांतर शत्रुत्वात झाले. कल्याणीने शूटर नेमला. त्याला बागेत नेले. तेथे फाेन करून सिप्पीला बाेलावले. सिप्पी बागेत पोहोचताच तिच्या डोळ्यांसमोर गोळ्या झाडून शूटरने त्याची हत्या केली, नंतर कल्याणी व शूटर तेथून निघून गेले.

सरन्यायाधीशांच्या मुलीला अटक, ४ दिवसांची कोठडी

सीबीआयने बुधवारी प्रभारी मुख्य न्यायाधीश सबिना यांची मुलगी कल्याणी सिंग यांना अटक केली. तिच्या चौकशीसाठी कोर्टाकडे १० दिवसांची कोठडी मागण्यात आली. मात्र, न्यायालयाने ४ दिवसांची कोठडी मंजूर केली. सिप्पीच्या हत्येनंतर कल्याणी आणि शूटर दोघेही घटनास्थळावरून साेबत निघून गेल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. याचे पुरावे मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...