आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Death Of A Talented Artist Like Sushant Is Unfortunate, The Truth Should Come Out: Supreme Court

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतसारख्या प्रतिभावंत कलाकाराचा मृत्यू दुर्दैवी, सत्य समोर यावे : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकिता लोखंडेने सीबीआयकडे चौकशी सोपवल्याचे स्वागत केले

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. तपासाबाबत बिहार आणि मुंबई पोलिसांतील वादावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. न्या. हृषीकेश रॉय यांचे पीठ म्हणाले. सुशांतसारखा प्रतिभावंत कलाकार आपण गमावणे हे अतिशय दुर्दैवी आहे. असामान्य स्थितीत त्याचा मृत्यू झाला. चौकशीनंतर सत्य समोर यायला हवे.

बिहार सरकारची सीबीआय चौकशीची शिफारस स्वीकारल्याने केंद्राने कोर्टात सांगितले. रियाचा खटला पाटण्यामधून मुंबईत वर्ग करण्याच्या मागणीवर कोर्टाने केंद्र, महाराष्ट्र, बिहार सरकार व सुशांतच्या कुटुंबाकडून ३ दिवसांच्या आत म्हणणे मागवले आहे.

महाराष्ट्राला फटकारले

या प्रकरणात चौकशीसाठी मुंबई पोलिस हे बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी केला. एसपी विनय तिवारी यांना बळजबरीने क्वॉरंटाइन केल्याचेही ते म्हणाले. यावर महाराष्ट्र सरकारला फटकारत न्यायमूर्ती रॉय म्हणाले, ‘एसपींना क्वाॅरंटाइन करणे हे चांगले संकेत नाहीत. बिहारमध्ये दाखल झालेला खटला मुंबईत सुरू असलेल्या चौकशीचा भाग नाही का? एकाच प्रकरणाची दोन राज्यांच्या पोलिसांनी चौकशी करणे योग्य नाही.’

हे कारस्थान : शिवसेना

सुशांतसिंह प्रकरणात राज्य सरकारचे मंत्री आदित्य ठाकरेंना गोवणे हे कारस्थान असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी केला. मात्र त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही.

... अखेर तो क्षण आलाच : अंकिता लोखंडे

सुशांतची पूर्वीची मैत्रीण अंकिता लोखंडेने सीबीआयकडे चौकशी सोपवल्याचे स्वागत केले. ज्या क्षणाची वाट बघत होते, तो अखेर आज आल्याचे ती म्हणाली. सुशांतच्या बहिणीने इन्स्टाग्रामवर लिहिले, “सीबीआय इट इज!! ही रक्षाबंधनाची भेट आहे.

दुसरीकडे, सुशांतचे मेव्हणे आणि आयपीएस ओ.पी. सिंह यांनी रियाला ठाण्यात बोलावून तिच्यावर दबाव टाकायला सांगितल्याचा दावा मुंबईचे डीसीपी परमजितसिंह दहियांनी केला.