आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Decision Of The Final Year Exams Is Not Even Today, The Decision Of The Exams Was Reserved By The Supreme Court

विद्यार्थ्यांचा संभ्रम कायम:अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निर्णय आजही नाहीच, सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला परिक्षांचा निर्णय

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय अद्यापही झालेला नाही. आज विद्यापीठाला युजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील निर्देशांविरोधात याचिकेवरील निकाल सुप्रीम कोर्टाकडून राखून ठेवण्यात आला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षांच्या निर्णयाची वाट पाहणारे विद्यार्थी अजूनही संभ्रमातच आहेत.

आज या याचिकांवर सुनावणी होती. यामध्ये आगामी तीन दिवसात सर्व याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात सुप्रीम कोर्टात मांडावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्र सरकार परीक्षा घेण्याच्या विरोधात आहेत. मात्र यूजीसीने परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. याच कारणामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते.

याचिकाकर्त्यांनी आपल्या लेखी सबमिशनद्वारे असा दावा केला आहे की, लागू केलेली मार्गदर्शक तत्त्वे 6 जुलै 2020 पर्यंत आहेत, त्यानुसार सर्व विद्यापीठांना 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ते यूजीसी कायद्याच्या कलम 12 चे उल्लंघन आहे.

बातम्या आणखी आहेत...