आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनचे संकट उद्भवल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढले आहेत. भारताला रशियाकडून सवलतीच्या दरात इंधन मिळणार आहे. भारत रशियाकडून क्रूड ऑइल खरेदीचे नियोजन करत असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या कायदेशीर व्यवहारांना राजकीय रंग देऊ नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इंधनाची गरज भागवण्यासाठी भारताला क्रूड ऑइल आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. दररोज जवळपास ८५ टक्के (५० लाख बॅरल) क्रूडची भारताला आयात करावी लागते. यातील बहुतांश आयात पश्चिम आशियाई देशांतून (इराक २३ टक्के, सौदी अरब १८ टक्के, यूएई ११ टक्के) केली जाते. आता अमेरिकाही (७.३ टक्के) भारतासाठी क्रूड ऑइलचे मोठा स्त्रोत बनली आहे. यंदाच्या वर्षी अमेरिकेतून कदाचित ११ टक्के क्रूडची आयात केली जाईल. सूत्रांनुसार, जागतिक भौगोलिक - राजकीय घडामोडींमुळे भारताच्या इंधन सुरक्षेसमोर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे इराण आणि व्हेनेझुएलातून होणारी आयात आपल्याला थांबवावी लागणार आहे. पर्यायी स्त्रोत नेमीच महाग असतात. त्यामुळे स्पर्धात्मक आयात करणे आवश्य झाले आहे. रशिया हा आपल्यासाठी किरकोळ पुरवठादार आहे. (एक टक्क्यापेक्षाही कमी, टॉप १० पुरवठादारांत समावेश नाही). सरकार ते सरकार अशा आयातीचे माध्यम उपलब्ध नाही. रशियातील ऑइल, गॅस जगभरातील विविध देशांकडून, विशेषत: युरोपीय देशांकडून आयात केले जाते. इंधनाच्या स्पर्धात्मक व्यवहारांवर भारताने लक्ष केंद्रित केले पाहिजे. सर्व ऑइल निर्मात्यांकडून येणाऱ्या अशा ऑफर्सचे स्वागत केले पाहिजे, असे तज्ज्ञांना वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.