आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Delhi High Court Asked The Government Why The Help Of The Troops Has Not Been Taken So Far; Lack Of Oxygen At Batra Hospital

दिल्लीत श्वासासाठी संघर्ष:दिल्लीतील बत्रा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 8 जणांचा मृत्यू; उच न्यायालयाने केंद्राले सांगितले, आता पाणी डोक्यावर गेललं आहे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या दिवशी न्यायालयाने सरकारले कडक निर्देश दिले होते

देशात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, आज ऑक्सिजनच्या कमतरतेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दिल्लीतील बत्रा रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमरतेमुळे शनिवारी 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत ऑक्सिजनची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने कोर्टाला सांगितले की, रुग्णालयात सकाळी 6 वाजेपासून आपत्कालीन स्थिती असून एका तासांपेक्षा जास्त वेळ ऑक्सिजनचा पुरवठा बंद होते. त्यामुळे रुग्णालयातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये काही डॉक्टरांचादेखील समावेश असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने न्यायालयाला सांगितले. विशेष म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाने सुनावणीदरम्यान, रुग्णालयात 307 पैकी 230 रुग्ण ऑक्सिजन अवलंबून असल्याची माहिती दिली होती.

न्यायालयाने सुनावणीदरम्यान, केंद्राला सरकारला कडक शब्दात फटकारले आहे. न्यायालयाने केंद्रास सांगितले की, आता पाणी डोक्यावर गेललं असून आम्हाला आता फक्त कामाशी गरज आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. दरम्यान, आता पुढील सुनावाणी सोमवारी होणार आहे.

देशात सध्या प्रत्येक व्यक्ती कंटाळला असून आम्हीदेखील यापरिस्थितीमुळे त्रस्त असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने बत्रा हॉस्पिटलवर टिप्पन्नी करताना सांगितले की, तुम्ही डॉक्टर असून तुम्हाला तुमची नाडी ओळखण्याची गरज आहे.

सैन्यांची मदत घेण्याचा सल्ला
दिल्ली उच्च न्यायालयाने राज्य सरकारला संबंधित कामात सैन्यांची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, राज्य सरकारने सांगितले की, आम्ही सध्या उच्चस्तरांवर काम करत असून आमचे याकडे लक्ष आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, तुम्ही जर सैन्याकडून मदत घेतली तर तुम्ही तुमच्या पातळीवर काम कराल. विशेष म्हणजे त्यांच्याकडे स्वतःची पायाभूत सुविधा आहे.

गेल्या दिवशी न्यायालयाने सरकारले कडक निर्देश दिले होते
दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारला फटकारले होते. दरम्यान, सरकार हे कोरोनाकाळात अपयशी ठरल्याचेदेखील सांगितले होते. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, कोरोनामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था डबघाईला आलेली आहे. कोणी विचार पण केला नसेल की यामुळे आपल्याला असे दिवस पाहायला मिळतील.

बातम्या आणखी आहेत...