आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅनल्सच्या वार्तांकनावर कोर्टाची नाराजी:...यापेक्षा तर दूरदर्शनचाचकाळ बरा होता, न्यूज चॅनल्सच्या वार्तांकनावर दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तींची टिप्पणी

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोठ्या व्यक्तींच्या खासगी जीवनाचा मुद्दा संवेदनशील असला तरी वृत्तवाहिन्या त्यांचे खासगी आयुष्य सार्वजनिक करू शकत नाही : कोर्ट
  • प्रोग्रॅम कोडचे पालन करा, अन्यथा आम्ही लागू करू : कोर्ट
  • बाॅलीवूड टीम व चित्रपट निर्मात्यांची याचिका

दिल्ली उच्च न्यायालयाने वृत्तवाहिन्यांच्या वार्तांकनावर नाराजी व्यक्त केली आहे. न्या. राजीव शकधर यांच्या पीठाने म्हटले, मोठ्या व्यक्तींच्या खासगी जीवनाचा मुद्दा संवेदनशील असला तरी तुम्ही (वृत्तवाहिन्या) त्यांचे खासगी आयुष्य सार्वजनिक करू शकत नाही. कृष्णधवल दूरदर्शनचा काळ यापेक्षा जास्त चांगला होता, अशी टिप्पणी न्यायमूर्तींनी केली. न्यायालयाने ही टिप्पणी बॉलीवूडची टीम व ३४ निर्मात्यांनी रिपब्लिक टीव्ही व टाइम्स नाऊने बॉलीवूडच्या तारे-तारकांविरोधात वार्तांकन करण्यास बंदी घालण्यासाठी दाखल याचिकांच्या सुनावणीदरम्यान केली. तसेच माध्यमांच्या घराण्यांना दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

प्रोग्रॅम कोडचे पालन करा, अन्यथा आम्ही लागू करू

कोर्ट म्हणाले, साेशल मीडिया प्लॅटफॉर्म अथवा त्यांच्या वाहिन्यांवर मानहानीकारक साहित्य अपलोड करू नये. तुम्ही प्रोग्रॅम कोडचे पालन करत नसाल तर न्यायालयास ते लागू करावे लागेल. या माध्यम घराण्यांच्या वकिलांनी याचे पालन करण्याचे आश्वासन दिले. आता यावर १४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तथापि, गुगल व फेसबुक यासारख्या पार्ट्यांना खटल्यातून वगळले आहे. त्याचबरोबर यूट्यूबवरही कथित अवमानकारक साहित्य हटवण्याबाबत आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...