आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तुशिल्प:निसर्गाच्या सान्निध्याची अनुभूती देते बंगळुरू येथील विमानतळाची रचना

जेम्स रसेलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड-१९ महामारी, युक्रेनवरील रशियन आक्रमण आणि वाईट हवामानामुळे उद्भवलेल्या आपत्तींमुळे अनेक प्रकल्प काही काळासाठी थांबवण्यात आले आहेत. तरीही सर्वोत्तम वास्तुकला आपली कार्यपद्धती, विचार करण्याची पद्धत आणि स्थानिक समाजाशी असलेले आपले नाते बदलू शकते. येथे नमूद केलेल्या काही रचना संकटाचे क्षण विसरण्यास मदत करतात. युक्रेनचा महान वास्तुशिल्प वारसा आणि जुन्या कलाकृतींचे जतन करण्याचे प्रयत्न, इजिप्शियन संग्रहालय, राष्ट्रीय अस्मिता कमी करणाऱ्या शक्तींविरुद्ध दृढनिश्चय दर्शवते. काही डिझाइन्स निसर्गाचे रक्षण करण्यासाठी ओढ निर्माण करतात.

भारतातील बंगळुरू विमानतळ व मॅनहॅटन, न्यूयॉर्कमधील गगनचुंबी इमारतीमागील सार्वजनिक बाग आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाते. ह्युस्टनमध्ये उत्तर अमेरिकेतील गवताळ प्रदेशाचे दृश्य आजूबाजूच्या नष्ट झालेल्या परिसराची आठवण करून देणारे आहे. मेजाटलान, मेक्सिकोतील एक मत्स्यालय व अमेरिकन नॅचरल हिस्ट्री म्युझियम अभ्यागतांना नैसर्गिक जगाबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचा मार्ग दाखवते.

बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वरील छोटा तलाव शहरातील तलावांचे चित्र दाखवतो. एसओएमआर्किटेक्चर कंपनीने त्याला टर्मिनल इन द गार्डन असे नाव दिले. तलावाभोवती प्रवाशांची ने-आण करण्यासाठी रॅम्प आहेत. २७ लाख चौरस फुटांवर पसरलेल्या विमानतळावर दरवर्षी अडीच कोटी प्रवाशांपर्यंत क्षमता वाढवली जात आहे. चेक-इन काउंटरभोवतीच्या टांगलेल्या टोपल्यांमध्ये द्राक्षाच्या वेली असतात. काचेच्या भिंतींनी वेढलेल्या टर्मिनलला तीन मजली उंच जंगल म्हणता येईल. येथे खूप झाडे आहेत. ऑक्टोबरमध्ये डिझाइन खुले होईल. विमान प्रवासाचा ताण आणि अस्वस्थता कमी करण्यात निसर्गाची ताकद दिसून येते.

डब्लिनच्या हेनेगन पेंग फर्मने इजिप्तच्या भव्य इजिप्शियन संग्रहालयाची रचना केली आहे. त्याचे बांधकाम अनेक दशकांपासून सुरू आहे. ते वर्षअखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. ते दहा लाख चौरस फुटांवर पसरलेले आहे. येथे नाईल नदीजवळ इजिप्तचे महान पिरॅमिड उभे आहेत. लांबपर्यंत पसरलेल्या बागा आणि मोठ्या बाजारपेठा लोकांना वाळवंटात घेऊन जातात. प्रवेशद्वाराजवळ सम्राट द्वितीय रामेसेसचा ४० फूट उंच पुतळा आहे. तुतनखामेनच्या थडग्यातील ५३०० वस्तू प्रदर्शित केल्या जातील. जागतिक स्मारक निधीने युद्धग्रस्त युक्रेनचा वारसा जतन करण्यासाठी एक निधी स्थापन केला आहे. हेलन फ्रँकेंथलर फाउंडेशनने या निधीला पाच लाख डॉलर्स दिले आहेत. या प्रकल्पांतर्गत देशातील २५०० ऐतिहासिक लाकडी चर्चना नवे रूप दिले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...