आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पृथ्वीच्या एका विस्तीर्ण भूभागाच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत. भारतातही वाऱ्याची दिशा बदलत आहे. उत्तरेकडील कमी दाबाच्या क्षेत्रात उच्च दबावामुळे वाऱ्याचा वेग वाढतो आहे. कोरडे वेगवान वारेही वाहत आहेत. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश व राजस्थानात रात्रीच्या तापमानात घट होत आहे. निरभ्र आकाशामुळे सध्या दिवसा उष्णता व रात्री थंडी जाणवत आहे.
हवामान शास्त्रज्ञांनुसार, पूर्ण ऑक्टोबर महिन्यात असेच हवामान असेल. अनेक भागांत रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा २ अंशांनी उतरू शकते. महिनाअखेर व नोव्हेंबरच्या सुरुवातीस अफगाणिस्तान आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या पश्चिमी वादळी वाऱ्याचे तडाखे वाढल्यास डोंगराळी भागात बर्फवृष्टी सुरू होईल. तसेच उत्तरी वाऱ्यामुळे दिवसाच्या तापमानातही घट होईल. त्याचा परिणाम गंगाकाठचा परिसर, राजस्थान व मध्य प्रदेशापर्यंत दिसेल. स्कायमेटनुसार, यावेळी ला निनाची स्थिती उद्भवू शकते. तसेच, हिवाळा लांबू शकतो. तसेच थंडीचा कडाका नेहमीपेक्षा जास्त राहू शकतो. याच स्थितीमुळे यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. प्रत्यक्षात अल निनोमध्ये याच्या विरुद्ध स्थिती असते. दरम्यान, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, हवामान बदलाचा परिणाम जगभरावर दिसत आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस पुढील तीन महिन्यांतील थंडीचा अंदाज वर्तवला जाईल. सध्या काहीही सांगणे घाईचे ठरेल.
तीव्र चढ-उतार वाढले, हिवाळ्यावर परिणाम जाणवेल
हवामान तज्ज्ञ डॉ. डी.एस. पई म्हणाले, वातावरणात तीव्र चढ-उतार होताहेत. उदा. मान्सून व उष्णतेचा एकाच क्षेत्रात वेगवेगळा परिणाम दिसतोय. एकीकडे अतिवृष्टी, दुसरीकडे दुष्काळ आला. हिवाळ्यात तापमानावर परिणाम दिसेल.
असा वाढेल थंडीचा कडाका : येत्या 2 आठवड्यांत 4 अंशांनी घसरेल पारा, दिवाळीपर्यंत आणखी गारठा
शास्त्रज्ञ महेश पलावत म्हणाले, दिल्ली-एनसीआरमध्ये किमान तापमान २० अंश आहे. पुढील २ आठवड्यांत ते १६-१७ अंशांपर्यंत उतरेल. पुढे दर आठवड्याला १ ते २ अंशांची घट होईल. ऑक्टोबरअखेरीस पश्चिमेकडून वादळी वारे आल्याने डोंगराळ भागात बर्फवृष्टी होईल. उत्तरी वाऱ्यामुळे मैदानी भागांत तापमान घसरेल. यामुळे दिवाळीच्या आसपास थंडी आणखी वाढेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.