आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडमधील चारधामपैकी तीन धामचे कपाट खुले झाले आहे. आता ८ मे रोजी वैदिक मंत्रोच्चारासह भगवान बद्रीनाथची द्वारे पहाटे ६ वाजून १५ मिनिटास खुली होतील. ग्रीष्मकाळात भगवान बद्रीविशाल यांची पूजाअर्चना होईल. यानिमित्ताने मंदिर तसेच मंदिर मार्गाला श्री बद्री-केदार पुष्प सेवा समितीकडून सुमारे २० क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे.
पहाटे तीन वाजेपासूनच कपाट खुलण्यास सुरुवात झाली. भगवान बद्रीनाथ धामचे कपाट खुले होण्याच्या निमित्ताने काही लाेकांना अखंड ज्योतीचे दर्शन घेता येऊ शकेल. त्यानंतर गर्भगृहात माता लक्ष्मीला मंदिरात विराजमान केले जाईल. मग भगवंताचे जिवलग उद्धव तसेच देवतांचे खजिनदार कुबेरास मंदिरात विराजमान केले जाईल. या दारांच्या तीन चाव्या तीन जणांकडे असतात.
तत्पूर्वी शनिवारी जोशीमठचे नृसिंह बदरी मंदिरात धर्माधिकारी, उपधर्माधिकारी, मंदिर पुजाऱ्यांनी वैदिक पूजेनंतर महालक्ष्मीच्या मंदिर प्रांगणात हवन तसेच अनुष्ठान करण्यात आले. १९६२ पासून बद्रीनाथचे मुख्य पुजारी रावल बीआरओंच्या वाहनाने जोशीमठ ते बद्रीनाथपर्यंत पोहोचतात. गढवाल स्काऊटच्या बँडच्या धूनवर पालखी बद्रीनाथांकडे रवाना करण्यात आली. भगवान बद्रीनाथचे कपाट सुरू होईपर्यंत गढवाल स्काऊट बँडची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते. पालखीच्या समोर बँड पुढे-पुढे जाताना दिसून येतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.