आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Doors Of Vaikom Mahadev Temple In Kerala Are Never Closed For The Hungry People, Every Morning And Evening Over 2000 People Eat Here

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरणा:केरळच्या या मंदिराची दारे भुकेल्यांसाठी कधी बंद होत नाहीत, दररोज सकाळी-संध्याकाळी 2000 वर लोक करतात भोजन

के. ए. शाजी | वायकॉम (कोट्टयम)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्राचीन शिवमंदिराची दारे बंद करण्याआधी सेवक विचारतात- कोणी भुकेले तर नाही ना?
  • 108 कुटुंबे अनेक पिढ्यांपासून पाहतात मंदिराची व्यवस्था

केरळच्या कोट्टयम जिल्ह्यातील वायकॉम महादेव मंदिर दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात अनेक शतकांपासून अन्नदानाची परंपरा सुरू आहे. तेथे भक्तगण रोज भुकेल्या लोकांसाठी भोजनाची सोय करतात. मंदिराच्या मुदपाकखान्यात रोज सकाळी-संध्याकाळी २००० पेक्षा जास्त लोकांसाठी भोजन तयार होते. सायंकाळी उशिरापर्यंत पंगती उठतात. मंदिराचे मुख्य दार बंद करण्याआधी हातात मशाल घेऊन मंदिराचे सेवक चारही प्रवेशद्वारांवर उभे राहून ‘अजून कोणाला जे‌वायचे आहे का?” अशी विचारणा करतात. कोणी होकारार्थी उत्तर दिले तर त्याला भोजन दिल्यानंतरच मंदिराची प्रवेशद्वारे बंद केली जातात. मंदिराचे पुजारी सुरेश पोट्टी यांनी सांगितले की, लोकांना या मंदिरात दोन्ही वेळा भोजन दिले जाते. मंदिराची ही परंपरा आजपर्यंत खंडित झालेली नाही. लाॅकडाऊनच्या काळातही येथे गरजूंना भोजन देण्यात आले. येथे महादेवाला वैक्कथप्पन आणि अन्नदाता प्रभू या नावांनी संबोधले जाते. केरळची इतर काही मंदिरेही दुपारी आणि रात्री भुकेल्यांसाठी भोजनाची व्यवस्था करत आहेत. त्यात तिरुवनंतपुरमच्या प्रसिद्ध पद्मनाभ मंदिराचाही समावेश आहे.

१०८ कुटुंबे अनेक पिढ्यांपासून पाहतात मंदिराची व्यवस्था

नामपुथिरी कुटुंब अनेक पिढ्यांपासून भोजन बनवत आहे. ते पारंपरिक पद्धतीने सकाळी स्नान करतात. नंतर पारंपरिक अग्निकुंडातील अग्नीने महादेवाची पूजा करतात. त्यानंतरच स्वयंपाकघरातील काम सुरू होते. तेथे मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. सणाच्या दिवशी रोज ३६०० किलो तांदळाचा भात बनवतात. भाज्या चिरण्याचा अधिकार ‘पाथिनारनमार’ अशी ओळख असलेल्या १६ नायर कुटुंबांकडे आहे. या मंदिराची व्यवस्था अनेक पिढ्यांपासून १०८ कुटुंबांकडेच आहे.