आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Driver Amit Was Under The Car, The Accused Knew That There Was Someone Under The Car, Still The Vehicle Started

अंजली प्रकरणात 5 नव्हे 7 आरोपी:चालक अमित होता कारखाली,कारखाली कुणीतरी असल्याचे आरोपींना माहीत होते

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या कंझावाला भागात १२ किमीपर्यंत कारने फरपटत नेलेली तरुणी अंजली सिंहच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, गाडीखाली तरुणी आली असल्याचे आरोपींना माहीत होते. तरीही त्यांनी गाडी थांबवली नाही. या प्रकरणात गुन्हेगारी कट आणि पुरावे नष्ट करण्याचे कलम जोडले आहे. तपासात आणखी एक बाब समोर आली की, घटनेच्या रात्री कार दीपक नव्हे तर अमित खन्ना चालवत होता. अमितकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे आरोपींनी बचाव करण्यासाठी दीपकचे नाव पुढे केले होते.

गाडीचे मालक आशुताेष यांनीही पोलिसांची दिशाभूल केली. त्यामुळे दोघांनाही आरोपी केले आहे. त्यांचा शोध सुरू आहे.दरम्यान, पाच आरोपींची कोठडी संपल्यावर न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना आणखी ४ दिवसांची कोठडी दिली. अंजली व आरोपींची जुनी ओळख नव्हती.

बातम्या आणखी आहेत...