आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Drug Factory Of Terrorism; Pakistan Is Creating Terrorists By Supplying Drugs To Addicted Youth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा ट्रेंड:दहशतवादाची ड्रग फॅक्टरी; व्यसनी युवकांना ड्रग पुरवून पाकिस्तान घडवतोय दहशतवादी

मोहित कंधारी | जम्मू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुप्तचर खात्याचा अलर्ट : या प्रकारे ग्रॅनेड हल्ला आणि राजकीय कार्यकर्त्यांना केले जात आहे लक्ष्य

दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान आता खाेऱ्यात विस्तारलेल्या आपल्या विषारी अमली पदार्थाच्या जाळ्याचा वापर दहशतवादी हल्ल्यांसाठी करत आहे. नशेत गुरफटलेल्या युवकांना अमली पदार्थ देऊन त्यांचा वापर ग्रॅनेड हल्ला, शस्त्र हिसकावणे,बंदुकीच्या धाकावर निवडणूक लढणाऱ्यांंना धमकावण्यासाठी केला जाऊ शकताे. गुप्तचर संस्थांनी राज्यात हाेत असलेल्या डीडीसी निवडणुकांच्या वेळी अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले हाेण्याची शक्यता लक्षात घेऊन जम्मू-काश्मीर प्रशासनाला सतर्कही केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रशासित राज्यांचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी शांततापूर्ण निवडणुका करणे व अशा प्रकारचे हल्ले राेखण्यासाठी बैठक घेतली. पाकिस्तान एलएसी, आंतरराष्ट्रीय सीमा आणि ड्राेनच्या मदतीने दहशतवाद्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत अमली पदार्थ आणि शस्त्र पुरवत आहे. गेल्या काही दिवसांत अशी प्रकरणे पकडण्यात आली. खाेऱ्यात जूनपासून आतापर्यंत झालेल्या एक डझनपेक्षा जास्त राजकीय कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येमध्ये या नार्काे-दहशतवादी माॅड्यूलचा हात असण्याची शंका सुरक्षा संस्थांनी व्यक्त केली आहे. मॉड्यूल उघडकीस आणण्यासाठी एनआयए दहशतवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या नेटवर्कवर नजर ठेवून आहे. नार्काे-दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात एनआयएने पंजाबमधील माेहालीच्या विशेष न्यायालयाने हिजबुल मुजाहिदीनच्या १० आराेपींच्या विराेधात १४ हजार पानांचे आराेपपत्र दाखल केले . अमृतसर पाेलिसांनी हिलाल अहमद नावाच्या व्यक्तीकडून २९ लाख रुपये जप्त केले हाेते. मेमध्ये एनआयएने हे प्रकरण आपल्या हातात घेऊन हेराॅइनची तस्करी व विक्रीत सहभागी असलेेले एक माेठे नार्काे-दहशतवादी माॅड्यूलचे पितळ उघडे पाडले. एनआयएने पंजाब, हरियाणा व जम्मू-काश्मीरमधील संशयित आणि आराेपींशी संबंधित १५ ठिकाणी तपासणी करून आतापर्यंत ९८.५ लाख रुपये, ८ वाहने, ३ किलाे हेराॅइन जप्त केले. जुलै २०२० मध्ये एनआयएने श्रीनगरच्या सहकारी बँकेचे व्यवस्थापक अफाक अहमद वाणीला अटक करून २१ किलाेग्रॅम हेराॅइन व १.३५ काेटी रुपये जप्त केले. एनआयएचे प्रवक्ते म्हणाले की, आराेपी नियंत्रण रेषेच्या माध्यमातून माेठ्या प्रमाणावर ड्रग्ज व अन्य अमली पदार्थांची तस्करी व विक्रीतून मिळालेली रक्कम खाेऱ्यातील लष्कर-ए-ताेयबा या दहशतवादी संघटनेच्या कारवायांना निधी पुरवण्यासाठी वापरली जात हाेती.

बातम्या आणखी आहेत...