आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The ED On Tuesday Summoned Pooja Singhal For Questioning, Latest News And Update

IAS पूजा सिंघलच्या अडचणींत वाढ:ED ने उद्या चौकशीसाठी बोलावले; पती व CA ची सलग दुसऱ्या दिवशी झाली चौकशी

रांची2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडच्या सनदी अधिकारी तथा खाण सचिव पूजा सचिव यांच्या अडचणींत चांगलीच वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांचे पती अभिषेक झा व सीए सुमनकुमार यांची सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी कसून चौकशी केली. तपास अधिकारी या प्रकरणी या दोघांची समोरासमोर बसवून चौकशी करत आहेत. त्यानंतर आता खुद्द पूजा यांनाही मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी 2 महिला ईडीच्या कार्यालयात धडकल्या. या महिला सीएच्या नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. ईडीने त्यांना सीएची भेट घेण्याची परवानगी दिली.

ED कार्यालयात पोहोचलेल्या महिला.
ED कार्यालयात पोहोचलेल्या महिला.

सूत्रांच्या माहितीनुसार ED ने मंगळवारी सकाळी पूजा सिंघल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यातच राज्य सरकारने त्यांच्या निलंबनाचे संकेत दिल्याने त्यांच्या अडचणींत चांगलीच वाढ झाली आहे. या प्रकरणी राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत एखादा ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पूजा व अभिषेक यांना अटक होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

रविवारी अभिषेकची 8 तास चौकशी

रविवारी ईडीने पूजा सिंघल यांचे पती अभिषेक यांना 60 प्रश्न विचारले. अभिषेक व सुमन सिंह या दोघांची समोरसमोर बसवून 8 तास चौकशी केली. त्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करणाऱ्या पत्रकारांना टाळण्यासाठी अभिषेकने कार्यालयाच्या भींतीवरुन उडी मारुन पळ काढला.

ED च्या कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी पोहोचलेले अभिषेक झा.
ED च्या कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी पोहोचलेले अभिषेक झा.

ईडीने पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांना समंस बजावून रविवारी एअरपोर्ट रोडवरील आपल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. तिथे रिमांडवर घेण्यात आलेल्या त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट सुमन सिंह यांची अगोदरपासूनच चौकशी सुरू होती.

सुमन सिंह यांच्या निवासस्थानावरील छापेमारीत 19 कोटी रुपयांची रोकड आढळली होती.
सुमन सिंह यांच्या निवासस्थानावरील छापेमारीत 19 कोटी रुपयांची रोकड आढळली होती.

ED ने विचारले -पल्स हॉस्पिटलमध्ये कुणाचा पैसा लागला

ED ने अभिषेक यांना विचारले -बरियातू स्थित पल्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामावर आतापर्यंत किती पैसे खर्च झाले? हा पैसा कुठून आला? यासंबंधीचे दस्तावेज कुठे आहेत? या रुग्णालयात पूजा सिंघल यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभाग आहे किवा नाही?

सूत्रांच्या माहितीनुसार, अभिषेक यांना यापैकी अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाही. दुसरीकडे, सीए सुमन सिंह यांना छापेमारीत जप्त करण्यात आलेली 19.31 कोटींची रक्कम कुठून आली? हे पैसे कुणाचे आहेत? पैशाचा स्त्रोत कोणता? आदी प्रश्न विचारण्यात आले. पण, त्यांनाही त्याची योग्य ती उत्तरे देता आली नाही.

बरियातू स्थित पल्स रुग्णालय.
बरियातू स्थित पल्स रुग्णालय.

सिंघलच्या खात्यात वेतनाची 1.43 कोटींहून अधिकची रक्कम, सीएच्या खात्यात 16.57 लाख वर्ग

ईडीने पूजा सिंघल यांच्या बँक खात्यात त्यांच्या वेतनाची 1.43 कोटींहून अधिकची रक्कम आढळल्याचे सांगितले आहे. ही रक्कम त्यांना 3 जिल्ह्यांतील डीसीपदी नियुक्ती असताना मिळाली होती. ईडीने सीएच्या रिमांडची मागणी करताना कोर्टाला ही माहिती दिली. एजंसीने सांगितले की, 2007 ते 2013 दरम्यान बँकेत जमा झालेल्या पैशांतून त्यांनी 13 वीमा पॉलिसी खरेदी केल्या. यासाठी त्यांनी 16.57 लाख रुपये 3 खात्यांत ट्रान्सफर केले. हे तिन्ही खाते सुमन यांच्याशी संबंधित होते.

बातम्या आणखी आहेत...