आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Editors Guild Expressed Concern Over The Action Taken Against The Bhaskar Group

नवी दिल्ली:भास्कर समूहावरील कारवाईबद्दल एडिटर्स गिल्डने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकारितेच्या स्वातंत्र्याविरुद्ध सरकारी संस्थांच्या होत असलेल्या वापराबाबत एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने (इजीआय) चिंता व्यक्त केली आहे. शुक्रवारी गिल्डने नमूद केले की, देशातील प्रमुख वृत्तपत्र समूह दै. भास्करच्या कार्यालयांवरील छाप्यांबद्दल आम्हाला चिंता वाटते.

ईजीआयने म्हटले आहे की, स्वतंत्र पत्रकारितेविरुद्ध सरकारी संस्थांचा वापर एक शस्त्र म्हणून केला जात असल्याची चिंता आहे. पेगासस हेरगिरीच्या पार्श्वभूमीवर हे अधिक गंभीर आहे. कारवाईसाठी जी वेळ निवडली तो पण एक गंभीर आणि चिंतेचाच विषय आहे. एडिटर्स गिल्डने आपल्या वक्तव्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भास्करने केलेल्या वार्तांकनाचा विशेष उल्लेख केला. गुरुवारी दैनिक भास्कर समूह आणि उत्तर प्रदेशातील भारत समाचार या वृत्तवाहिनीविरुद्धच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ईजीआयने ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, प्राप्तिकरची ही कारवाई शुक्रवारीही सुरू होती.

दरम्यान, अमेरिकेत कमिटी ‘टू प्रोजेक्ट जर्नालिस्ट”ने म्हटले आहे की, ही कारवाई सरकारवर टीका करणाऱ्या मोठ्या माध्यम समूहांना धमकावण्याच्या उद्देशानेच केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...