आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:वाचकांना कोरोनावरील लसीच्या चाचणीची वस्तुस्थिती कळावी यासाठी ‘दैनिक भास्कर’च्या संपादकांनी स्वत: टाेचून घेतली लस

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लस घेताना लक्ष्मीप्रसाद पंत. - Divya Marathi
लस घेताना लक्ष्मीप्रसाद पंत.
  • मानवतेशी संबंधित शतकातील सर्वात मोठ्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने आम्ही आनंदी आहोत

सध्या सर्वात जास्त चर्चा होत आहे ती कोरोना लसीची. लसीचा परिणाम काय असेल? ती प्रभावी असेल का? साइड इफेक्ट्स किती असतील? असे प्रश्न लोकांच्या मनात आहेत. त्यामुळे ‘दैनिक भास्कर’चे नॅशनल एडिटर लक्ष्मीप्रसाद पंत आणि जयपूरचे हेल्थ रिपोर्टर संदीप शर्मा यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वत: लस घेतली. त्यांचे हे अनुभव त्यांच्याच शब्दांत...

सध्या कोरोना लसीबाबत अनेक खऱ्या-खोट्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत. त्यामुळे लसीच्या चाचणीची वस्तुस्थिती वाचकांसमोर यावी यासाठी मी स्वत: या प्रक्रियेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. जयपूरचे हेल्थ रिपोर्टर संदीप शर्माही या निर्णयात सहभागी झाले.

सर्वप्रथम आम्ही स्वयंसेवक म्हणून महाराजा अग्रसेन रुग्णालयात नोंदणी केली. चाचणी कक्षात डॉ. मनीष जैन यांनी वैद्यकीय चाचणीबाबत माहिती दिली. मी चाचणीसाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे, अशी सहमती घेण्यात आली. लसीच्या दोन चाचण्यांत कुठलाही साइड इफेक्ट समोर आला नाही तसेच अंतिम टप्प्यातील चाचणीतही कदाचित कुठलाही त्रास होणार नाही, असे सांगण्यात आले. पूर्ण समाधान झाल्यानंतर माझी शारीरिक तपासणी सुरू झाली. पहिल्या टप्प्यात डेमोग्राफिक्स (उंची आणि वजन) करण्यात आले. नंतर रक्तदाब, श्वसनसंस्था, नाडी आणि ऑक्सिजन पातळी तपासली. तिसऱ्या टप्प्यात कोविड चाचणी, रक्त चाचणी झाली. नंतर मला लस दिली. एक डायरी कार्ड देण्यात आले. त्यात तब्येत बिघडल्यास डायल करायचे क्रमांक आणि केव्हा-काय लक्षणे अथवा त्रास होत आहे याचा तपशील लिहिण्यास सांगण्यात आले.

कुठल्याही प्रकारच्या अडचणीसाठी त्वरित फोन करता यावा यासाठी मला एक नंबर देण्यात आला. लस घेणाऱ्या ज्या ८०० लोकांच्या गटात आम्ही आहोत, त्यापैकी सर्व जण पूर्णपणे नॉर्मल आहेत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणखी एक गोष्ट. एक पत्रकार म्हणून आतापर्यंत कोरोना वेदनांच्या बातम्या सर्वात आधी देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडली आहे. आता लसीच्या चाचणीत सहभागी होऊन आम्ही शतकातील सर्वात चांगल्या बातमीचा भाग होत आहोत, याचा आनंद आहे.

३३ तास उलटले, दर ३ तासांनी आमची होत आहे विचारपूस
आम्ही शनिवारी दुपारी ३ वाजता लस घेतली होती. तेव्हापासून रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत ३३ तास झाले आहेत. आम्ही पूर्णपणे नॉर्मल आहोत. डॉक्टर दर ३ तासांनी फोन करून आमची विचारपूस करत आहेत. आमच्यावर कुठलीही बंदी नाही तसेच कसलेही पथ्य पाळण्यास सांगितलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...