आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Election Commission Convened An All party Meeting Against The Backdrop Of Rising Corona Infection

चार टप्प्यातील मतदानानंतर निवडणूक आयोगाला आली जाग:​​​​​​​सायंकाळी 7 ते सकाळी 10 पर्यंत प्रचारास बंदी, 48 ऐवजी 72 तासांपूर्वीच प्रचार बंद होणार

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताचा आहे. येथे 7 मार्चला भाजपकडून मोठ्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील झाले होते. या रॅलील लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते.  - Divya Marathi
फोटो पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताचा आहे. येथे 7 मार्चला भाजपकडून मोठ्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील झाले होते. या रॅलील लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. 
  • कोर्टाने दिले कोविड नियमांचे पालन करण्याचे आदेश

सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात आयोगाने पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर लगाम कसली आहे.

निवडणूक आयोगाने सांगितले की, आता यापुढील प्रचारात रात्री 7 वाजेपासून सकाळी 10 पर्यंत कोणताच पक्ष प्रचार करू शकणार नाही. याशिवाय, मतदानाच्या 72 तासांपूर्वीच प्रचार संपवावा लागेल. यापूर्वी मतदानाच्या 48 तासांपूर्वीपर्यंत प्रचार करण्यास मुभा होती. बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान होत आहे, यातील 4 टप्प्यातील मतदान झाले आहे. शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला आणि पक्षाला कोरोना नियमांचे पालन करावे लागेल. याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल. या अंतर्गत गुन्हादेखील दाखल केली जाऊ शकतो.

बंगालमध्ये सध्या चार टप्प्यातील मतदान बाकी
पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानात 45 जागांसाठी 17 एप्रिल, सहाव्या टप्प्यातील 43 जागांसाठी 22 एप्रिल, सातव्या टप्प्यातील36 जागांसाठी 26 एप्रिल आणि आठव्या टप्प्यातील 35 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे. तसेच, या निवडणुकीचा निकाल दोन मे रोजी लागेल.

कोर्टाने दिले कोविड नियमांचे पालन करण्याचे आदेश

काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला खडसावत निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. त्यामुळे आयोग संविधानातील कलम-324 अंतर्गत पक्षांना प्रचार आणि प्रसाराबाबत आदेश देऊ शकतात. याशिवाय, उर्वरित टप्प्यातील मतदान एकदाच घेणे किंवा पुढे ढकलण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

निवडणुकीमुळे रुग्ण वाढले

सरकार आणि निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, असाम आणि पुडुचेरीमधील नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे. मागील दिड महिन्यांपासून सुरू असलेल्या निवडणुकीमुळे राज्यात कोरोना धोका खूप वाढला आहे. हे आम्ही नाही, तर आकडे सांगत आहेत. आम्ही 1 ते 14 एप्रिलपर्यंची आकडेवारी पाहिली. यानुसार, पश्चिम बंगालमध्ये 420%, असाम 532%, तमिळनाडू 159%, केरळ 103% आणि पुड्‌डुचेरीमध्ये 165% कोरोना रुग्णांची वाढ आणि मृत्यूमध्येही 45% वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...