आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Elimination Of Separatism; 85% Reduction In Stone Throwing Incidents In Kashmir; News And Live Updates

ग्राउंड रिपोर्ट:फुटीरवादाचा खात्मा; काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांत 85% घट; 70 हून जास्त फुटीरवादी नेते जेरबंद; बँक खाती, मालमत्तेवर टाच

श्रीनगर2 महिन्यांपूर्वीलेखक: मुदस्सिर कुल्लू
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांत फुटीरवादी गटांवर मोठ्या पातळीवर कारवाई

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्याच्या निर्णयास दोन वर्षे पूर्ण झाली. या काळात फुटीरवादाचा जवळपास खात्मा झाला. सोबतच दगडफेकीच्या घटनांतही मोठ्या प्रमाणात घट झाली. ऑगस्ट २०१९ च्या आधीपासून काश्मीरमध्ये दगडफेकीची संस्कृती तयार झाली होती. दररोज दगडफेकीच्या घटना होत होत्या. जम्मू-काश्मीर पोलिस विभागाच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये १९९० हून जास्त दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या.

२०२० मध्ये २५० घटनांची नोंद झाली. म्हणजे हे प्रमाण ८५ टक्के कमी झाले. २०२१ मध्ये अशा घटना १०० हून कमी होतील असे अधिकाऱ्यांना वाटते. यशामागे कलम ३७० हटवणे, फुटीरवाद्यांवर कडक कारवाई इत्यादी कारणे आहेत. कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर सरकारने फुटीरवादी नेत्यांची तुरुगांत रवानगी केली. त्यांची बँक खाती बंद केली.

त्याचबरोबर व्यापक पातळीवर त्यांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारची कडक कारवाई अद्यापही सुरू आहे. २०१९ मध्ये सुमारे ७० व २०२० मध्ये सहा फुटीरवाद्यांना अटक झाली होती. २०१९ नंतर सर्व फुटीरवादी नेत्यांची निवासस्थानी असलेली सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षा रक्षक काढून घेण्यात आले. त्यामुळे दोन वर्षांत कोणत्याही फुटीरवादी गटाने बंदचे आवाहन केले नाही. हे गट नेत्यांच्या अटकेनंतर निष्क्रिय झाले आहेत. काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचे कमांडर बुरहान वानीच्या हत्येनंतर दगडफेक व फुटीरवाद्यांच्या बंदच्या आवाहनामुळे वातावरण तापत होते. २०१६ मध्ये दगडफेकीच्या २,६५३ घटनांची नोंद झाली होती. व्यापक कारवाईमुळे फुटीरवाद्यांच्या कुरापती थांबल्या आहेत.

दहशतवाद व दगडफेकीने काश्मीरमध्ये केवळ विद्ध्वंस निर्माण केला, असे तज्ञ जाहिद बट यांनी सांगितले. 5 ऑगस्ट राेजी घडलेल्या गाेष्टीबद्दल मतभेद असू शकतात. परंतु दगडफेक हे काही उत्तर असू शकत नाही या गोष्टीची तरुणांना जाणीव होत आहे हे चांगले झाले. खोऱ्यातील फुटबॉलचे चाहते मोहंमद शाहिद म्हणाले, काश्मिरींनी कलम ३७० रद्दबातल ठरवल्यानंतर परिपक्वता दाखवली. दगडफेक, दहशतवाद कोणत्याही समस्येवरील तोडगा नसल्याची तरुणांना जाणीव झाली आहे. तरुण खेळावर लक्ष देत आहेत.

फंडिंग रोखण्यासाठी संशयित,बंदी असलेल्या संघटनांवर कारवाई
केंद्राने काश्मीरमध्ये सर्वाधिक प्रभावी सामाजिक व धार्मिक संघटना जमात-ए-इस्लामीवर जोरदार कारवाई सुरू केली. दहशतीसाठी निधी देण्याच्या आरोपाखाली शेकडो सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही अजूनही तुरुंगात आहेत. जमात-ए-इस्लामीच्या किमान २९ कार्यकर्त्यांना २०१९ मध्ये आणि आठ जणांना २०२० मध्ये ताब्यात घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...